तेल हे एक अत्यंत महत्वाचं इंधन आहे. तेल किती मोठं अस्त्र आहे हे (cheap) इराण-अमेरिका युद्धामुळे अनुभवता आलं. तेल सगळ्या जगासाठी अत्यावश्यक आहे. तेलावर अनेक देशांच्या अर्थव्यवस्था टिकून आहेत. आज जगात तेल मुबलक प्रमाणात आहे. पण हे तेल सहज मिळत नाहीय हा आज जगासमोरच मुख्य प्रश्न आहे. याला कारण आहे अमेरिका-इराण युद्ध. सध्या दोन्ही देशांकडून सीजफायर लागू आहे. पण स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून जलवाहतूक अजूनही पूर्ववत झालेली नाही. या महत्वाच्या तेलमार्गावरुन वाहतूक अजूनही रखडत, रखडत सुरु आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात सतत तेलाच्या किंमतीत चढ-उतार सुरु आहेत. रशियानंतर आता आणखी एका देशाने भारतात स्वस्तात तेल खरेदीची ऑफर दिली आहे. हा खरंतर फायद्याचा सौदा आहे.

इराकच्या तेल खरेदीदारांमध्ये भारत सुद्धा आहे. इराकने त्यांच्या(cheap) सर्व तेल खरेदीदारांना कच्चा तेलाच्या खरेदीत मोठी सवलत देऊ केली आहे. या महिन्यात कार्गोवर लोड होणाऱ्या कच्चा तेलाच्या टर्म कॉन्ट्रॅक्टच्या खरेदीदारांना ही डिस्काऊंट ऑफर आहे. यात अडचण फक्त एकच आहे, कुठल्या देशाला इराकचं हे स्वस्त तेल विकत घ्यायचं असेल तर फारसच्या खाडीच्या आत जाऊन टर्मिनलवरुन तेल उचलावं लागेल. त्यासाठी स्ट्रेट ऑफ हॉर्मुज पास करावं लागेल. सध्या जहाज वाहतुकीसाठी हा खूप धोकादायक मार्ग आहे.
इराकची सरकारी तेल कंपनी SOMO च्या 3 मे रोजीच्या एका डॉक्यूमेंटनुसार, ओपेकचा सदस्य असलेल्या इराकने बसरा मीडियम ग्रेडच्या प्रति बॅरल तेल पिंपावर 33.40 डॉलरची घसघशीत सवलत देत आहे. जहाजांच्या ट्रॅकिंगवरुन गोळा केलेल्या आकड्यांनुसार, एप्रिल महिन्यात इराकच्या दक्षिणेला असलेल्या बसरा बंदरात केवळ दोन टँकर कच्च तेलं लोड करण्यात आलं. मार्च महिन्यात हीच संख्या 12 टँकर होती.
जहाजांना हॉर्मुज मार्गे खाडीत प्रवेश करावा लागत असल्याने एप्रिल (cheap)महिन्यात तेल लोडिंगच प्रमाण घटलं. सामान्य परिस्थितीत या बंदरात 80 टँकर्समध्ये तेल लोडं होतं.इराकने तुर्कीच्या मार्गाने पाईपलाइनद्वारे तेलाची निर्यात सुरु ठेवली आहे. पण समुद्री कार्गोने जितकं तेल विकता येतं तितकं पाईपलाइन मार्गे विकता येत नाही. सध्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुजवर अमेरिका-इराण दोघांचं नियंत्रण आहे. त्यामुळे भारताला स्वस्तात तेल मिळेल. पण त्यासाठी धोका पत्करावा लागेल.
हेही वाचा
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
महाराष्ट्रात संतापजनक प्रकार! भोंदूच्या नावाखाली १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; उपचाराच्या बहाण्याने
नसरापूर प्रकरण 2 प्रकरणातून निर्दोष सुटका होताच आरोपीने केली भयंकर गोष्ट, ज्यामुळे तपासात अडथळे