उन्हाळा सुरू झाला की एसीचा वापर झपाट्याने वाढतो. (summer)मात्र योग्य देखभाल न केल्यास हाच एसी धोकादायक ठरू शकतो. अलीकडेच दिल्लीतील विवेक विहार येथे पहाटेच्या सुमारास एका चार मजली इमारतीत भीषण आग लागली. प्राथमिक माहितीनुसार एसीमध्ये झालेल्या स्फोटामुळे ही दुर्घटना घडली आणि त्यात ८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे घरगुती एसी वापरताना सुरक्षिततेकडे दुर्लक्ष किती महागात पडू शकते, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

उन्हाळ्यात तापमान खूप वाढल्याने एसीवर जास्त ताण येतो. (summer)सतत अनेक तास एसी चालू ठेवल्यामुळे त्याचा कंप्रेसर गरम होतो आणि त्यातील दाब वाढतो. याशिवाय धूळ साचणे, गॅस लीक होणे, वायरिंगमधील बिघाड किंवा स्पार्किंग यांसारख्या समस्या दुर्लक्षित केल्यास धोका आणखी वाढतो. अनेकदा लहानसहान त्रुटींकडे दुर्लक्ष केल्यामुळेच मोठे अपघात घडतात.
१. स्वतः दुरुस्ती करण्याचा मोह टाळा
एसीमध्ये काही बिघाड झाला तर स्वतः हात घालण्यापेक्षा तज्ज्ञ तंत्रज्ञाची मदत घ्या. चुकीच्या हाताळणीमुळे धोका वाढू शकतो.
२. नियमित सर्व्हिसिंग आवश्यक
ठराविक काळाने एसीची सर्व्हिस करून घेणे खूप गरजेचे आहे. यामुळे यंत्रणेवरचा ताण कमी राहतो आणि ओव्हरहिटिंगचा धोका कमी होतो.
३. गॅस लीककडे दुर्लक्ष करू नका
कूलिंग कमी होणे किंवा विचित्र वास येणे यासारखी लक्षणे दिसल्यास गॅस लीक असू शकते. (summer)लगेच तंत्रज्ञाला बोलावून तपासणी करून घ्या.
४. फिल्टर स्वच्छ ठेवा
धूळ साचलेले फिल्टर एसीची कार्यक्षमता कमी करतात आणि मशीन जास्त गरम होण्याची शक्यता वाढवतात. त्यामुळे फिल्टर वेळोवेळी साफ करा किंवा बदलून घ्या.
५. स्वतंत्र वीज जोडणी वापरा
एसीसाठी वेगळा प्लग आणि सॉकेट वापरणे अधिक सुरक्षित असते. एकाच सॉकेटवर अनेक उपकरणे जोडल्यास ओव्हरलोड होऊन आग किंवा स्फोटाचा धोका वाढतो.
हेही वाचा
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
महाराष्ट्रात संतापजनक प्रकार! भोंदूच्या नावाखाली १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; उपचाराच्या बहाण्याने
नसरापूर प्रकरण 2 प्रकरणातून निर्दोष सुटका होताच आरोपीने केली भयंकर गोष्ट, ज्यामुळे तपासात अडथळे