पिण्याच्या पाण्याचे “दक्षिणायण”

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये “कोल्हापूर दक्षिण”हा मतदारसंघ अस्तित्वात आला. कधी सतेज पाटील गट तर कधी महादेवराव महाडिक गटाकडे हा मतदारसंघ अलटून पालटून फिरत राहिला. (assembly constituency) सध्या कोल्हापूर दक्षिणचे नेतृत्व अमल महाडिक यांच्याकडे आहे. दोन्ही गटांनी एकमेकांचे राजकीय शत्रुत्व जपण्यासाठी जेवढा वेळ दिला तितका वेळ विकास कामांसाठी दिला असता तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात आला असता.

कोल्हापूर शहरातील महापालिकेचे तत्कालीन 28 प्रभाग आणि करवीर तालुक्यातील 32 गावे असा हा कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ तयार करण्यात आला आहे. राजकारणासाठी आणि सत्ता करण्यासाठी महाडिक आणि पाटील या दोन्ही गटांनी कोल्हापूर दक्षिण हा विधानसभा मतदारसंघ निवडला आहे. या दोन्ही गटातील संघर्षाची सुरुवात कोल्हापूर शहराला खेटून असलेल्या पाचगाव या छोट्याशा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून झाली. कोल्हापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघाची पाचगाव ही जणू राजधानीच बनली होती.

हेही वाचा

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एकाचवेळी ४५०० रुपये! ‘ई-केवायसी’ न केलेल्यांना मिळणार नाही लाभ; अधिकाऱ्यांनी सरकारकडे ‘ही’ विनंती, वाचा…

कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट

महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?