उन्हाळा सुरू होताच घराघरात (potatoes) एक मोठी समस्या डोकं वर काढते कांदे आणि बटाटे पटकन खराब होण्याची. उष्णता, आर्द्रता आणि चुकीची साठवण यामुळे हे दोन्ही अत्यावश्यक पदार्थ कुजणे, अंकुर येणे किंवा मऊ पडणे यासारख्या समस्यांना सामोरे जातात. मात्र काही सोप्या आणि प्रभावी उपायांनी ही समस्या सहज टाळता येऊ शकते.सर्वात महत्त्वाचं म्हणजे कांदे आणि बटाटे कधीही एकत्र ठेवू नयेत.

बटाट्यांमधून बाहेर पडणारा (potatoes)ओलावा आणि गॅस कांद्यांना लवकर खराब करतो. त्यामुळे दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी साठवणे गरजेचे आहे. तसेच त्यांना हवेशीर जागेत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी जाळीदार पिशव्या किंवा टोपल्या वापरल्यास हवा खेळती राहते आणि ओलावा साचत नाही.कांदे आणि बटाटे थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावेत.
उन्हामुळे त्यांची बाह्य त्वचा (potatoes)खराब होते आणि आतून कुजण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते. घरात थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवले तर त्यांचा टिकाव वाढतो. बटाटे साठवताना त्यांच्यावर माती लागलेली असेल तर ती धुवू नये, कारण ओलावा वाढल्याने ते लवकर सडतात. वापरण्यापूर्वीच स्वच्छ धुणे अधिक योग्य ठरते.एक छोटा पण उपयुक्त उपाय म्हणजे बटाट्यांमध्ये एक-दोन सफरचंद ठेवणे. सफरचंदातून निघणारा नैसर्गिक वायू बटाट्यांना अंकुर येण्यापासून रोखतो. त्याचप्रमाणे कांद्यांच्या साठवणीत खराब झालेले कांदे वेळीच वेगळे काढणे आवश्यक आहे, अन्यथा ते इतरांनाही खराब करतात.या साध्या सवयी अंगीकारल्यास उन्हाळ्यातही कांदे आणि बटाटे दीर्घकाळ ताजे राहू शकतात. थोडी काळजी घेतली तर अन्नाची नासाडी टाळता येते आणि घरखर्चातही बचत होते.