आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाराष्ट्रात बँका बंद? जाणून घ्या RBIची अपडेट

आज, मंगळवार 14 एप्रिल 2026 रोजी देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, (festivals) बैसाखी आणि तमिळ नववर्ष यांसारखे महत्त्वाचे सण मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. या पार्श्वभूमीवर बँका सुरू असतील की बंद, याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र Reserve Bank of India (RBI) ने जाहीर केलेल्या अधिकृत सुट्ट्यांच्या यादीप्रमाणे आज देशातील बहुतांश राज्यांमध्ये बँकांना सुट्टी आहे.

महाराष्ट्रासह मुंबई, पुणे, नागपूर या प्रमुख शहरांमध्ये डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने सर्व बँका बंद राहणार आहेत. याशिवाय दिल्ली, कर्नाटक, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांमध्येही बँकिंग सेवा आज ठप्प राहणार आहेत. पंजाबमध्ये बैसाखी, आसाममध्ये बोहाग बिहू तर तामिळनाडूमध्ये तमिळ नववर्षामुळे स्थानिक स्तरावरही बँकांना सुट्टी देण्यात आली आहे.

या सुट्टीमुळे शाखांमध्ये होणारे सर्व प्रत्यक्ष व्यवहार, जसे की रोख रक्कम जमा किंवा काढणे, चेक जमा करणे, पासबुक अपडेट करणे आदी सेवा आज उपलब्ध नसतील. त्यामुळे ग्राहकांनी बँकेत जाऊन व्यवहार करण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र डिजिटल बँकिंग सेवा सुरळीत सुरू राहणार आहेत. UPI अॅप्स, मोबाईल आणि नेट बँकिंगद्वारे व्यवहार करता येतील. तसेच एटीएम सेवा आणि NEFT, RTGS सारख्या ऑनलाइन निधी हस्तांतरण सुविधाही नेहमीप्रमाणे कार्यरत राहतील.

दरम्यान, चेक क्लिअरन्स, कॅश डिपॉझिटसारखी कामे पुढील कार्यदिवशी म्हणजेच 15 एप्रिलपासून पुन्हा सुरू होतील. RBI च्या नियमानुसार, देशातील सर्व बँका प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसेच सर्व रविवारी बंद असतात. याशिवाय विविध राज्यांमध्ये स्थानिक सण आणि सार्वजनिक सुट्ट्यांनुसार बँकांच्या सुट्ट्यांमध्ये बदल होत असतो.

हे ही वाचा ;

मोबाईलच्या किमतीत मोठी वाढ; जाणून घ्या कोणत्या कंपनीचे फोन किती महाग झाले?

लाडक्या बहि‍णींची अर्जप्रक्रिया पुन्हा सुरु होणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

दहावी, बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट, या दिवशी लागण्याची शक्यता