या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आठव्या वेतन आयोगाचा फायदा; पगारवाढ अन् एरियर मिळणार

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. (employees) आठव्या वेतन आयोगाच्या प्रक्रियेला गती मिळाली असून, या आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि निवृत्तीवेतनात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या या आयोगासाठी नियुक्त समिती विविध स्तरांवरून सूचना आणि अभिप्राय गोळा करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आठव्या वेतन आयोगाचा फायदा सुमारे ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. म्हणजेच जवळपास एक कोटीहून अधिक लोकांना या निर्णयाचा थेट फायदा मिळणार आहे. आयोगाच्या शिफारसी १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्या तारखेपासून कर्मचाऱ्यांना थकबाकी (एरियर) मिळण्याची शक्यता देखील आहे.

दर दहा वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना केली जाते आणि त्यामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन यामध्ये बदल करण्यात येतो. यंदाच्या आठव्या वेतन आयोगासाठीही विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत प्राध्यापक पुलक घोष आणि पंकज जैन हे सदस्य म्हणून काम पाहत आहेत.

सध्या ही समिती विविध मंत्रालये, कर्मचारी संघटना आणि निवृत्तीवेतनधारकांकडून सूचना घेत आहे. या सर्व सूचनांचा अभ्यास करूनच अंतिम शिफारसी तयार केल्या जाणार आहेत. वेतनवाढीचा दर, भत्त्यांमध्ये होणारे बदल आणि पेन्शनमध्ये वाढ यासंदर्भातील अंतिम निर्णय या शिफारसींवर आधारित असेल. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये त्याचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले. आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी सुमारे १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा देणारे निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा ;

मोबाईलच्या किमतीत मोठी वाढ; जाणून घ्या कोणत्या कंपनीचे फोन किती महाग झाले?

लाडक्या बहि‍णींची अर्जप्रक्रिया पुन्हा सुरु होणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

दहावी, बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट, या दिवशी लागण्याची शक्यता