राजस्थानमधील अलवर येथे दिल्ली–मुंबई एक्सप्रेसवे वर मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसची केमिकल टँकरशी जोरदार धडक झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ३० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामुळे काही काळ महामार्गावर मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, हा (horrific accident) अपघात एक्सप्रेसवेवरील चॅनल १०० इंटरचेंजजवळ झाला. केमिकलने भरलेला टँकर आणि प्रवासी बस यांची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. धडक इतकी तीव्र होती की बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले. मृतांमध्ये बस चालक, एक महिला आणि दोन मुलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकांनी जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले असून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, काही जखमी प्रवाशांनी पोलिस उशिरा पोहोचल्याचा आरोप केला आहे, त्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक तपासात अतिवेग आणि निष्काळजीपणा कारणीभूत असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
हे ही वाचा ;
मोबाईलच्या किमतीत मोठी वाढ; जाणून घ्या कोणत्या कंपनीचे फोन किती महाग झाले?
लाडक्या बहिणींची अर्जप्रक्रिया पुन्हा सुरु होणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
दहावी, बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट, या दिवशी लागण्याची शक्यता