होर्मुज खाडी परिसरात अमेरिकेच्या नाकेबंदीनंतर परिस्थितीत लक्षणीय बदल दिसू लागले आहेत. ताज्या अहवालांनुसार, नाकेबंदी लागू झाल्यानंतर (significant changes) इराणमधील कोणत्याही बंदरातून जहाज बाहेर पडलेले नाही. उलट, अमेरिकेकडून दिलेल्या इशाऱ्यानंतर इराणची सहा जहाजे परत फिरल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, अमेरिकाने मोठा दावा करत सांगितले की, गेल्या २४ तासांत होर्मुज खाडीतून २० पेक्षा अधिक जहाजांनी कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास केला. गेल्या काही दिवसांपासून बंदसदृश स्थितीत असलेली ही खाडी आता पुन्हा हळूहळू सुरू होत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही लष्करी कारवाईशिवाय किंवा गोळीबाराशिवाय ही हालचाल सुरू असल्याने ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, या संघर्षात प्रथमच अमेरिकेची दबावनीती प्रभावी ठरताना दिसत आहे.
नाकेबंदीमुळे इराणवर आर्थिक आणि व्यापारी दबाव वाढला असून आयात-निर्यात व्यवहारांवर त्याचा थेट परिणाम झाला आहे. त्यामुळे इराणसमोर युद्धबंदीशिवाय पर्याय उरत नसल्याचे संकेत मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर, डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत युद्ध संपण्याच्या मार्गावर असल्याचा दावा केला आहे. काही अटींवर इराणने सकारात्मक भूमिका दर्शवली असल्याचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे लवकरच दुसऱ्या युद्धबंदी बैठकीचे आयोजन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या संघर्षाचा परिणाम इतर देशांवरही होत असून भारतवरही त्याचा फटका बसला आहे. युद्धबंदी घडवून आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे. याच दरम्यान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवर चर्चा झाल्याचेही समोर आले आहे. एकूणच, होर्मुज खाडीत सुरू झालेली हालचाल आणि वाढलेली राजनैतिक हालचाल लक्षात घेता, दीर्घकाळ सुरू असलेल्या या तणावाच्या परिस्थितीत आता शांततेकडे वाटचाल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
हे ही वाचा ;
१८० मुलींचे लैंगिक शोषण, आरोपी निघाला MIM चा नेता
दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! उद्या १० वीचा निकाल लागणार?
अविवाहितांना कॅन्सरचा धोका ८५% जास्त; रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर