नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत महिलांवर लैंगिक छळ (sexual harassment) आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या गंभीर आरोपांनी राज्यभरात मोठी खळबळ उडवली आहे. गेल्या आठवड्यात उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. सुरुवातीला काही महिला पोलिस अधिकाऱ्यांनी गुप्तपणे वेषांतर करून कंपनीत प्रवेश केला आणि प्रत्यक्ष गैरवर्तन पाहिल्यानंतर आरोपींना ताब्यात घेतले, त्यामुळे या प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले.

या प्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली असली तरी कंपनीची HR एक्झिक्युटिव्ह निदा खान ही अजूनही फरार आहे. तिचे नाव FIRमध्ये समोर आल्यानंतर ती लपून बसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. एसआयटीच्या तपासात तिची भूमिका अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट होत असून, ती केवळ कर्मचारी नसून या संपूर्ण नेटवर्कमधील सक्रिय घटक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
तपासातून असे समोर आले आहे की, निदा खानवर पीडित महिलांवर मानसिक दबाव टाकणे, आरोपींना साथ देणे आणि धर्मांतरासाठी सक्ती करणे यांसारखे आरोप आहेत. काही पीडितांच्या मते, त्यांना विशिष्ट धार्मिक प्रथा पाळण्यास भाग पाडले जात होते, तसेच त्यांच्या वागणुकीवर आणि कपड्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता. या सर्व प्रकारांमुळे पीडितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींमध्ये समन्वय साधण्यासाठी एक WhatsApp ग्रुप वापरला जात होता. या ग्रुपमध्ये संभाव्य टार्गेट्सची चर्चा, त्यांच्यावर कसा प्रभाव टाकायचा याबाबत नियोजन केले जात होते. निदा खानही या ग्रुपची सदस्य असल्याचे समोर आले आहे. मात्र, या ग्रुपमधील अनेक चॅट्स डिलीट करण्यात आल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या फॉरेन्सिक तज्ज्ञ त्या चॅट्स पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
या प्रकरणात आतापर्यंत 12 महिला समोर आल्या असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पीडितांनी दिलेल्या जबाबांनुसार, त्यांना शिवीगाळ, अयोग्य स्पर्श आणि मानसिक छळ सहन करावा लागला. तसेच धर्मांतरासाठी दबाव आणल्याचेही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
तपासादरम्यान इम्रान नावाचा एक संशयितही समोर आला असून त्याचे परदेशातील संपर्क असल्याचा संशय आहे. WhatsApp चॅट्सच्या आधारे त्याच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे. दरम्यान, कंपनीतील भरती प्रक्रियेतही काही गैरप्रकार झाले का, याची तपासणी केली जात आहे.
सध्या या संपूर्ण प्रकरणात फरार असलेल्या निदा खानला अटक करणे आणि तिच्या नेटवर्कचा उलगडा करणे हेच तपास यंत्रणेसमोरचे मोठे आव्हान आहे. पोलिसांनी कंपनी व्यवस्थापनाकडून संबंधित कागदपत्रे आणि नोंदी मागवल्या असून तपासाची व्याप्ती आणखी वाढवण्यात येत आहे.
हे ही वाचा ;
१८० मुलींचे लैंगिक शोषण, आरोपी निघाला MIM चा नेता
दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! उद्या १० वीचा निकाल लागणार?
अविवाहितांना कॅन्सरचा धोका ८५% जास्त; रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर