१४ एप्रिल रोजी संपूर्ण राज्यात भीम जयंती उत्साहात साजरी होत असताना बुलढाणा आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये घडलेल्या दोन हत्यांच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. आनंद आणि अभिमानाच्या वातावरणात साजऱ्या होणाऱ्या या दिवशी घडलेल्या हिंसक प्रकारांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये भीम जयंतीची रॅली पार (enthusiasm) पडल्यानंतर काही तासांतच एक धक्कादायक घटना घडली. रॅलीत सहभागी झालेल्या पप्पू या युवकावर रात्री उशिरा बाजार लाईन परिसरात अचानक हल्ला करण्यात आला. आरोपी सोनू वसंत जाधव याने गुप्तीने सपासप वार करत पप्पूला गंभीर जखमी केले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली. शनी पटांगण परिसरात ३८ वर्षीय एकनाथ बाळकृष्ण गायकवाड यांच्यावर अज्ञात व्यक्तीने सिमेंटच्या ब्लॉकने डोक्यात वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना प्रथम उपजिल्हा रुग्णालयात आणि नंतर नाशिक येथे हलवण्यात आले, मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दोन्ही घटनांनी राज्यभरात खळबळ उडाली असून सण-उत्सवाच्या काळातही गुन्हेगारीचे सावट कायम असल्याचे चित्र समोर आले आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिस प्रशासनावर कायदा व सुव्यवस्था अधिक कडक करण्याचा दबाव वाढत आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांचा तपास वेगाने सुरू केला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
हे ही वाचा ;
१८० मुलींचे लैंगिक शोषण, आरोपी निघाला MIM चा नेता
दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! उद्या १० वीचा निकाल लागणार?
अविवाहितांना कॅन्सरचा धोका ८५% जास्त; रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर