सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! महागाई भत्ता वाढणार; पगारात इतक्या रुपयांची होणार वाढ

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर येत (government employees) असून जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याच्या (DA) वाढीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साधारणपणे दरवर्षी जानेवारी आणि जुलै या दोन टप्प्यांमध्ये महागाई भत्त्यात वाढ केली जाते. मात्र यावेळी जानेवारी महिन्याची घोषणा अद्याप प्रलंबित असून ती लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार यंदा महागाई भत्त्यात सुमारे 2 टक्क्यांची वाढ होऊ शकते. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 58 टक्के दराने महागाई भत्ता मिळत असून ही वाढ मंजूर झाल्यास तो 60 टक्क्यांवर पोहोचेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट वाढ होणार आहे.

महागाई भत्त्यातील वाढीचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, 18,000 रुपये मूळ पगार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नात काहीशे रुपयांची वाढ होऊ शकते, तर 29,200 रुपये किंवा 56,100 रुपये मूळ पगार असणाऱ्यांना त्यानुसार अधिक फायदा मिळू शकतो. उच्च पगार श्रेणीतील कर्मचाऱ्यांना तर महिन्याला हजारोंमध्ये वाढ दिसू शकते.

महागाई भत्ता हा ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) यांच्या आधारे ठरवला जातो. मागील काही महिन्यांतील महागाईच्या सरासरीवरून हा दर निश्चित केला जातो. त्यामुळे महागाई वाढल्यास DA वाढण्याची शक्यता अधिक असते.

यंदा घोषणा उशिरा होत असली तरी जानेवारी 2026 पासूनची वाढ लागू केली जाणार असल्याने कर्मचाऱ्यांना थकबाकी (arrears) देखील मिळणार आहे. त्यामुळे एकरकमी रक्कमही त्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत सरकारकडून अधिकृत निर्णय जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

हे ही वाचा ;

१८० मुलींचे लैंगिक शोषण, आरोपी निघाला MIM चा नेता

दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! उद्या १० वीचा निकाल लागणार?

अविवाहितांना कॅन्सरचा धोका ८५% जास्त; रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर