बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना (politics) उधाण आले आहे. अजित पवार यांच्या रिक्त जागेसाठी होत असलेल्या या निवडणुकीत पवार कुटुंब पूर्ण ताकदीने मैदानात उतरले असून प्रचाराला वेग आला आहे. बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आता ही लढत अधिकच प्रतिष्ठेची बनली आहे.

प्रचाराच्या शुभारंभी राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते एकत्र दिसले. Sharad Pawar यांच्यासह पवार कुटुंबातील सदस्यांनीही मतदारसंघात सक्रिय सहभाग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर Sunetra Pawar यांना बारामतीचा गड जिंकणे अवघड नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र निवडणुकीच्या धामधुमीतच एक वेगळी राजकीय मागणी समोर आली आहे.
प्रचारादरम्यान मंत्री Aditi Tatkare यांनी सुनेत्रा पवार या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हाव्यात, अशी भावनिक अपेक्षा व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात महिला नेतृत्वाच्या शक्यतेबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. राज्यात अनेक प्रभावी महिला नेते होऊन गेल्या असल्या तरी मुख्यमंत्रीपदावर अद्याप कोणतीही महिला विराजमान झालेली नाही, ही बाब पुन्हा अधोरेखित झाली.
या विधानावर भाजपकडूनही तत्काळ प्रतिक्रिया आली. वरिष्ठ नेते Chandrakant Patil यांनी याबाबत बोलताना स्वप्न पाहणे चुकीचे नसल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला मोठ्या पदावर पाहण्याची इच्छा ठेवणे स्वाभाविक असल्याचे ते म्हणाले. सध्याच्या घडीला Devendra Fadnavis मुख्यमंत्री असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, मात्र भविष्यात काय होईल हे कोणी सांगू शकत नाही, असेही सूचक वक्तव्य त्यांनी केले.
या सर्व घडामोडींमुळे बारामतीची निवडणूक केवळ स्थानिक न राहता राज्याच्या सत्तासमीकरणांशी जोडली गेली आहे. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीपासून ते त्यांच्या संभाव्य मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांपर्यंत राजकीय वातावरण तापले असून आगामी काळात या चर्चांना आणखी धार येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
लोकसभेत घुमणार महिलांचा आवाज! संसदेत दिसणार आता 850 खासदार
इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय