धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लाडकी आणि बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल आणि तिचा एक्स पती भरत तख्तानी यांच्या घटस्फोटानंतर(divorce), अलीकडेच दोघांना एकत्र पाहिल्यानंतर पुन्हा ते एकत्र येत असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. पण आता भरतच्या नवीन फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

भरतच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला आहे का? भरतच्या नवीन फोटोंमुळे सोशल मीडियावर प्रेमाची नवी चर्चा सुरू झाली आहे. भरतने एका मुलीसह फोटो शेअर केला असून आपल्या कुटुंबात स्वागत केले आहे आणि त्यामुळे भरत पुन्हा प्रेमात पडला असून आता कधीही ईशासह एकत्र येणार नाही अशा चर्चांना सुरूवात झालीये

भरत तख्तानी आणि ईशा देओल २०२४ मध्ये वेगळे झाले. प्रेमविवाह करून १२ वर्षे एकत्र आयुष्य घालवल्यानंतर आणि दोन मुली झाल्यानंतर, दोघांमध्ये असे काही घडले की सर्व काही संपले. भरत आणि ईशाने २०२४ मध्ये वेगळे होण्याची घोषणा केली. भरत सध्या युरोप ट्रिपवर आहे, तो मिस्ट्री गर्लसोबत अत्यंत Lovey dovey पोजमध्ये दिसला आहे. हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

युरोप ट्रिपवर भरत तख्तानी उद्योजक मेघना लखानीसोबत फिरताना दिसला. खरंतर, त्याने मेघनासोबतच्या युरोप ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये, दोघेही स्पेनमधील माद्रिदमध्ये एकत्र दिसले.भरतने एका पोस्टमध्ये ‘माझ्या कुटुंबात स्वागत आहे’ रेड हार्ट इमोजीसह लिहिले आहे, तर मेघनाने तिच्या पोस्टमध्ये ‘प्रवास येथून सुरू होतो’ असे लिहिले आहे, फोटोंमध्ये, दोघेही रात्रीच्या वेळी कॅज्युअल कपड्यांमध्ये शहरात मजा करताना दिसत आहेत. त्यामुळे आता भरत पुन्हा एकदा नव्या आयुष्याला सुरूवात करत असल्याचे दिसून येत आहे.

या अपडेटने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे, कारण अलीकडेच ईशा आणि भरत परमार्थ निकेतनमध्ये एकत्र गंगा आरती करताना दिसले. स्वामी चिदानंद सरस्वती यांच्यासोबत या आध्यात्मिक कार्यक्रमात दोघांनीही धार्मिक विधी केले. या फोटोंमुळे त्यांच्या नात्यात समेट होण्याची शक्यता निर्माण झाली होती आणि अशा चर्चांनाही सुरूवात झाली होती. घटस्फोटानंतर प्रथमच ते दोघे एकत्र दिसले होते.

ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचे २०१२ मध्ये मुंबईतील इस्कॉन मंदिरात लग्न झाले. त्यांना दोन मुली आहेत, राध्या (२०१७) आणि मिराया (२०१९). घटस्फोटानंतर, दोघांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. या संक्रमणादरम्यान, आमच्या मुलांचे कल्याण ही आमची पहिली प्राथमिकता आहे.’ या फोटोनंतर आता भरत आणि ईशा एकत्र येणार नाहीत हे नक्कीच स्पष्ट झाले आहे(divorce).

हेही वाचा :

ट्रिक घेताच कपिल देवच्या पंक्तीत जाऊन बसला
Tata Altroz Facelift बेस व्हेरिएंट तुमच्या दारात उभी, किती असेल EMI?
आजचा शनिवार राशींसाठी भाग्याचा! शनिदेव पाठीशी भक्कम,