कोणतीही सेलिब्रिटी जोडी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करते इथपासून ते अगदी ही जोडी साखरपुडा, लग्न असे टप्पे ओलांडते तेव्हा चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. अशाच एका सेलिब्रिटी(celebrity) जोडीनं अनेक वर्षांपासूनच्या त्यांच्या नात्याला एक नवं आणि तितकंच खास नाव दिलं आहे. नात्यामध्ये असणाऱ्या वयाच्या अंतराची तमा न बाळगता या दोघांनी एकमेकांवरील प्रेमाचा एक नवा प्रवास सुरू केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी या नात्याची माहिती चाहत्यांना दिली.

सेलिब्रिटी जोडप्याचा साखरपुडा, कोण आहे ही जोडी?
मे महिन्यातच आपल्या वैयक्तिक जीवनासंदर्भात मोठी माहिती देत दाक्षिणात्य अभिनेता विशाल यानं अभिनेत्री साई धनशिकासोबतच्या नात्याची कबुली दिली होती. याच जोडीनं आता चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देत आपला साखरपुडा झाल्याची गोड बातमीसुद्धा जाहीर केली आहे.

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून या सेलिब्रिटी(celebrity) जोडीनं साखरपुड्याच्या छोटेखानी समारंभातील काही खास क्षण चाहत्यांसमोर आणले. या फोटोंमध्ये ही जोडी त्यांच्या कुटुंबीयांसमवेत दिसत आहे. शिवाय एकमेकांना अंगठ घालतानाचा क्षणही या जोडीनं कॅमेरात कैद केला आहे. चाहत्यांनी हे फोटो पाहताक्षणीच या सेलिब्रिटी जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरूवात केली.

विशाल आणि साईच्या नात्यामध्ये असणारं वयाचं अंतर हे त्यांच्या नात्याला कायमच चर्चेच आणणारं एक कारण ठरलं आहे. या दोघांच्या वयामध्ये 12 वर्षांचं अंतर असलं तरीही प्रेमाच्या या नात्यात वयामधील फकत कधीच आड आला नाही हेच त्यांच्यातील प्रेम पाहून लक्षात येत आहे.

साखरपुड्याचे फोटो शेअर करत या सेलिब्रिटी(celebrity) जोडीनं आपल्याला जगभरातून शुभेच्छा येत असल्याचं आणि आशीर्वाद मिळत असल्याचं सांगितलं. यासाठी त्यांनी सर्व कुटुंबीय आणि चाहत्यांचे आभारही मानले. साखरपुड्याची ही गोड बातमी चाहत्यांना सांगताना आपल्याला फार आनंद वाटत असल्याचं या जोडीनं सांगितलं.

साई धनशिका आणि विशाल या जोडीनं जेव्हा त्यांच्या नात्याची सर्वप्रथम घोषणा केली होती, तेव्हा धनशिकानं आपण विशालला 15 वर्षांपासून ओळखत असल्याचं सांगितलं. आव्हानात्मक प्रसंगांमध्ये विशाल कायमच आपल्यासोबत होता याचमुळं हे नातं आणखी दृढ झालं असं या अभिनेत्रीचं मत. तर, साई धनशिका आपली जोडीदार असणं ही अतिशय आनंदाचीच बाब असल्यानं मी नशिबवान आहे अशा शब्दांत विशालनं देवाचे आभारही मानले.

एकमेकांवर असणारं प्रेम आणि या जोडीच्या मनात एकमेकांप्रती असणारा आदर पाहून चाहतेही भारावून गेले. इतकंच नव्हे, तर त्यांनी लवकरात लवकर लग्नही करावं अशी हक्काची मागणीसुद्धा चाहत्यांनी केली. तेव्हा आता या जोडीचा विवाहसोहळा नेमका कधी पार पडतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल…

हेही वाचा :

आज सोनं स्वस्त झालं की महाग? आजचे 18,22 आणि 24 कॅरेटचे दर

Ex नवरा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात फोटो व्हायरल

मराठा आरक्षण आंदोलन आता निर्णायक वळणावर