टाटाच्या अनेक कार मार्केटमध्ये लोकप्रिय आहेत. त्यातीलच(tata altroz price) एक कार म्हणजे टाटा अल्ट्रोज. याच कारच्या बेस व्हेरिएंटसाठी जर तुम्ही 2 लाखांचं डाउन पेमेंट केल्यास याचा EMI किती असेल.

भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या अनेक वर्षांपासून बाजारात ग्राहकांच्या अपेक्षेनुसार उत्तमोत्तम कार ऑफर करत आहे. अशीच एक कंपनी म्हणजे Tata Motors. टाटाने (tata altroz price) बदलत्या काळानुसार विविध सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर केल्या आहेत. ग्राहक देखील नवीन कार खरेदी करताना सर्वप्रथम टाटाच्या कारला प्राधान्य देत असतात.

कंपनीने प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये Tata Altroz Facelift ऑफर केली आहे, जी त्यांची लोकप्रिय कार आहे. जर तुम्हाला या कारचा बेस व्हेरिएंट घरी आणायचा असेल, तर 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, 7 वर्षांसाठी तुम्हाला दरमहा किती EMI भरावे लागेल, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

Tata Altroz Facelift किंमत
टाटा मोटर्सने प्रीमियम हॅचबॅक कार सेगमेंटमध्ये टाटा अल्ट्रोज फेसलिफ्ट उपलब्ध केली आहे. त्याच्या पेट्रोल व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 6.89 लाख रुपये आहे. जर ती राजधानी दिल्लीमध्ये खरेदी केली तर सुमारे 56 हजार रुपयांच्या रजिस्ट्रेशनसह, सुमारे 33 हजार रुपये इंश्युरन्ससाठी द्यावे लागतील. त्यानंतर त्याची ऑन-रोड किंमत 7.78 लाख रुपये होईल.

2 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI
जर तुम्ही टाटा अल्ट्रोज फेसलिफ्टचा बेस व्हेरिएंट खरेदी केला तर बँक तुम्हाला फक्त एक्स-शोरूम किमतीवरच फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 5.78 लाख रुपयांची रक्कम फायनान्स करावी लागेल. जर बँक तुम्हाला 9 टक्के व्याजासह सात वर्षांसाठी 5.78 लाख रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील 7 वर्षांसाठी दरमहा फक्त 9304 रुपये EMI भरावा लागेल.

किती महागात पडेल कार
जर तुम्ही बँकेकडून 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 5.78 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 9304 रुपयांचा EMI भरावे लागतील. अशा परिस्थितीत, 7 वर्षांत तुम्हाला टाटा अल्ट्रोज फेसलिफ्ट बेस पेट्रोल व्हेरिएंटसाठी सुमारे 2.03 लाख रुपयांचे व्याज द्यावे लागेल. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 9.81 लाख रुपये असेल.

कोण कोणाशी स्पर्धा करते
अल्ट्रोज फेसलिफ्ट प्रीमियम हॅचबॅक कार सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सकडून ऑफर केली जाते. या सेगमेंटमध्ये, ही कार Maruti Suzuki Baleno, Toyota Glanza, Hyundai i20 सारख्या कारशी थेट स्पर्धा करते.

हेही वाचा :

तेव्हा दुसरा दरवाजा उघडतो!

भारताला जपान प्रवासाचे मोठे फळ; 40 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक

एकामागोमाग एक iPhone 17 Series मॉडेलशिवाय लाँच होणार ‘हे’ स्मार्टफोन्स