गुजरात टायटन्सला मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानात मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईचा अहमदाबादमधील हा गुजरात विरुद्धचा पहिलाच विजय ठरला. मुंबईला या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे.

मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सवर सोमवारी 20 एप्रिलला 99 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. मुंबईचा हा 19 व्या मोसमातील एकूण दुसरा विजय ठरला. मुंबई या मोसमात धावांबाबत मोठा विजय मिळवणारी पहिली टीम ठरली. मुंबईला या मोठ्या फरकाने विजय मिळवल्याचा पॉइंट्स टेबलमध्ये फायदा झाला आहे. मुंबईने पॉइंट्स टेबलमध्ये थेट 3 स्थानांची झेप घेतली आहे. या निमित्ताने 19 व्या मोसमातील 30 व्या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोणती टीम कितव्या स्थानी आहे हे जाणून घेऊयात.
मुंबईने तिलक वर्मा याने केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर गुजरातसमोर 200 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र अश्वनी कुमार याने 4 विकेट्स घेतल्या. तर इतर सहकाऱ्यांनी उल्लेखनीय बॉलिंग करत गुजरातचा डाव हा 15.5 ओव्हरमध्ये 100 धावांवर आटोपला. गुजरातची ही आयपीएल इतिहासातील दुसरी निच्चांकी धावसंख्या ठरली. (Mumbai )तसेच गुजरातचा हा धावांबाबत सर्वात मोठा पराभव ठरला. मुंबई 99 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकली. त्यामुळे मुंबईला नेट रनरेटमध्ये तगडा फायदा झाला आहे. या सामन्यानंतर पॉइंट्सटेबलध्ये कोणता संघ कोणत्या स्थानी आहे हे जाणून घेऊयात.
गुजरात विरुद्ध मुंबई सामन्याच्या निकालाचा पॉइंट्स टेबलमधील टॉप 5 मध्ये काहीही बदल झालेला नाही. पंजाब पहिल्या स्थानी कायम आहे. आरसीबी दुसऱ्या क्रमांकावर आहे.(Mumbai) राजस्थान तिसऱ्या स्थानी आहे. हैदराबाद आणि दिल्ली अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत. गुजरात मुंबई विरूद्धच्या पराभवानंतरही पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी कायम आहे.
मुंबईला 99 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवल्याने नेट रनरेटमध्ये जबरदस्त असा फायदा झाला आहे. मुंबईने 4 गुणांसह थेट दहाव्या क्रमांकावरुन सातव्या स्थानी झेप घेतलीय. मुंबईने केकेआर, लखनौ आणि चेन्नईला मागे टाकलं आहे. मुंबईचा या विजयासह नेट रनरेट हा +0.067 असा आहे जो सामन्याआधी -1.076 इतका होता.दरम्यान मंगळवारी 21 एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने असणार आहेत. उभयसंघातील सामना हा हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये होणार आहे. (Mumbai)दोन्ही संघांकडे विजय मिळवून पॉइंट्स टेबलमधील टॉप 3 मध्ये पोहचण्याची संधी आहे. आता दोघांपैकी कोणता संघ यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा
आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय
हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार