धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात पत्नीने फोन केला नाही या कारणावरून संतप्त पतीने तिच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. 25 वर्षीय ललिता पावरा यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

धुळे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीनेच आपल्या पत्नीची दगडाने ठेचून हत्या कल्याचे समोर आले आहे. बाहेरगावी गेल्यावर पत्नीने फोन का केला नाही या क्षुल्लक कारणावरून हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना शिरपूर तालुक्यातील खैरखुटी इथं शेकड्या पाडा भागात घडली.
काय घडलं नेमकं
कामानिमित्त चार दिवस बाहेर असतांनाही पत्नीने फोन करून साधी खुशालीही विचारली नाही. या कारणावरून पती संतापला. त्याने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. (Shirpur) या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ललिता सुनील पावरा (वय २५) असं मृत पत्नीचं नाव असून आरोपी पती सुनील सायमल पावरा (३०) याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. ही घटना 19 एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली. शिरपूर पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे हे अधिक तपास करीत आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे.
धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अविवाहित तरुणीने गर्भपाताच्या अधिक गोळ्यांचे सेवन केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत तरुणी हि १८ वर्षांची असून ती सहा महिन्यांची गरोदर होती.(shirpur)अधिक प्रमाणात औषधांची तिचा रक्तदाब कमी होऊन झटके येऊ लागले. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेने मोहाडी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत १८ वर्षीय तरुणीला प्रकृती खालावल्यामुळे देवपुरातील एका खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी केली असता, ती तरुणी २४ आठवड्यांची (६ महिने) गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. गरोदरपणा लपवण्यासाठी किंवा गर्भपात करण्यासाठी तिने काही औषधांचे सेवन केले होते, (shirpur) अशी माहिती डॉक्टरांनी तिच्या कुटुंबीयांना दिली.गर्भपाताच्या गोळ्यांचे प्रमाण अधिक झाल्यामुळे तरुणीचा रक्तदाब वेगाने कमी झाला आणि तिला झटके येऊ लागले. तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला तातडीने हिरे शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तेथील अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला.
हेही वाचा
आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय
हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार
कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे कोणती?
.