अक्षय्य तृतीयेनंतर सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे ताजे दर

सण-उत्सवाचा काळ संपल्यानंतर भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरणीचा कल पाहायला मिळत आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर स्थिर राहिलेले दर आता खाली येऊ लागल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जागतिक घडामोडी आणि आर्थिक आकडेवारीचा परिणाम या मौल्यवान धातूंच्या किमतीवर होत असून, सलग दोन दिवस सोन्याच्या भावात कपात नोंदवण्यात आली आहे.

राजधानी दिल्ली मध्ये २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या दरात गेल्या दोन दिवसांत प्रति दहा ग्रॅम ५०० रुपयांची घट झाली आहे, (Gold and silver )तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६० रुपयांनी खाली आला आहे. आज, २१ एप्रिलच्या सकाळी दोन्ही प्रकारच्या सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १० रुपयांची किरकोळ घट दिसून आली असून, बाजारात सोन्याची मागणी आणि पुरवठ्यातील बदलांमुळे हा परिणाम जाणवत आहे.

दुसरीकडे, चांदीच्या भावातही दोन दिवसांच्या स्थिरतेनंतर आज घसरण पाहायला मिळाली. दिल्लीमध्ये आज चांदी १०० रुपयांनी स्वस्त झाली असून तिची किंमत २,७४,९०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. (Gold and silver) यापूर्वी १७ एप्रिल रोजी चांदी ५,००० रुपयांनी स्वस्त झाली होती, मात्र त्यानंतर १८ एप्रिल रोजी तिच्या दरात १० हजार रुपयांची मोठी वाढ झाली होती, जी आता पुन्हा स्थिरावताना दिसत आहे.

भारतातील प्रमुख शहरांचा विचार करता, मुंबई आणि कोलकाता येथे चांदी दिल्लीच्या दराप्रमाणेच विकली जात आहे. मात्र, दक्षिण भारतातील चेन्नई शहरात चांदीचे दर देशात सर्वाधिक असून, तिथे एक किलो चांदीसाठी २,७९,९०० रुपये मोजावे लागत आहेत. महानगरांमधील करांची रचना आणि स्थानिक मागणी यामुळे या किमतींमध्ये फरक जाणवत आहे.

सध्या पश्चिम आशिया मधील राजकीय तणाव कायम असल्याने जागतिक बाजारपेठेत अस्थिरता आहे. (Gold and silver ) गुंतवणूकदार आणि व्यापारी आता कच्च्या तेलाच्या किमती तसेच अमेरिका आणि ब्रिटन मधील उत्पादन व सेवा क्षेत्राच्या पीएमआय आकडेवारीवर लक्ष ठेवून आहेत. आगामी काळातील ग्राहकांचा कल आणि गृहनिर्माण क्षेत्रातील आकडेवारी या मौल्यवान धातूंच्या किमतीची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.

हेही वाचा

आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे कोणती?