घराघरात वापरल्या जाणाऱ्या फ्रिजमुळे अन्न ताजे ठेवणे सोपे झाले असले तरी फ्रीझरमध्ये साचणाऱ्या बर्फामुळे निर्माण होणारी दुर्गंधी ही अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. विशेषतः दीर्घकाळ फ्रीझरमध्ये ठेवलेला बर्फ काही वेळाने वास देऊ लागतो आणि त्याचा परिणाम थेट अन्नाच्या चव आणि गुणवत्तेवर होतो.

तज्ज्ञांच्या मते, ही समस्या केवळ गोठवण्याच्या प्रक्रियेमुळे नसून फ्रीझरमध्ये ठेवलेल्या विविध पदार्थांमुळेही निर्माण होते. घरगुती फ्रीझरमध्ये अन्न हळूहळू गोठत असल्याने ‘ओडर अॅक्टिव्ह कंपाउंड माइग्रेशन’ ही प्रक्रिया घडते. (freezer) यामुळे एका पदार्थाचा वास दुसऱ्या पदार्थांपर्यंत पोहोचतो. उदाहरणार्थ, मासे किंवा मांस नीट झाकून ठेवले नाही, तर त्यांचा तीव्र वास फ्रीझरमधील बर्फातही मिसळतो.
याच कारणामुळे घरातील बर्फाचे तुकडे हे बाजारातील बर्फासारखे स्वच्छ आणि गंधहीन राहत नाहीत. संशोधनानुसार, हळूहळू गोठण्याच्या प्रक्रियेदरम्यान काही रासायनिक बदल होतात,(freezer) ज्यामुळे चव आणि सुगंधावर परिणाम होतो. बर्फाचे कण मोठे आणि खडबडीत बनतात, ज्यामुळे ते आसपासचा वास सहज शोषून घेतात. परिणामी, जास्त काळ ठेवलेला बर्फ वापरताना चव बदलल्याचा अनुभव येतो.
तसेच, फ्रीझरमध्ये सतत होणारी गोठणे आणि वितळणे ही प्रक्रिया अन्नाच्या गुणवत्तेलाही बाधा आणते. विशेषतः मांस वितळवताना त्यातील रस बाहेर पडतो, ज्याला ‘पर्ज लॉस’ असे म्हटले जाते. (freezer) यामुळे मांस कोरडे आणि कमी चविष्ट बनते.तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, फ्रीझरमध्ये अन्न योग्य प्रकारे झाकून ठेवणे, नियमित साफसफाई करणे आणि दीर्घकाळ बर्फ साठवून न ठेवणे यामुळे ही समस्या टाळता येऊ शकते.
हेही वाचा
आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय
हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार