घरात घुसून दिव्यांग महिलेवर बलात्कार, नवरा कामावरून घरी आल्यानंतर बायकोची अवस्था पाहून हादरला

बिहारमध्ये दिव्यांग महिलेवर घरात घुसून बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली. पीडित महिलेचा नवरा आणि सासू घराबाहेर गेल्याचा फायदा घेत आरोपीने भयंकर कृत्य केले. या घटनेमुळे परिसर हादरला आहे.

बिहारमध्ये दिव्यांग महिलेवर बलात्कार
पाटणाजवळील नौबतपूर येथे घडली घटना
महिला घरात एकटी असल्याचा आरोपीने घेताल फायदा
कामाला गेलेला नवरा घरी आल्यानंतर घटना आली उघडकीस

बिहारची राजधानी पाटणा येथे एका दिव्यांग महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. पाटणाजवळील दानापूर जिल्ह्यातील नौबतपूर येथे ही घटना घडली. पीडितेने आपल्या कुटुंबीयांना रडत रडत ही घटना सांगितली (house) त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने घरात घुसून पीडित महिलेवर बलात्कार करून घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी नौबतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, नौबतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या २५ वर्षीय दिव्यांग महिलेवर बलात्कार करण्यात आला. पीडितेचा नवरा आणि सासू नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर गेले असताना ही घटना घडली. पीडित महिला दिव्यांग असून ती घरात एकटी होती. याचा फायदा घेऊन आरोपी घरात घुसला आणि त्याने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. पीडितेने विरोध करूनही आरोपीने तिचे ऐकले नाही.

बलात्कार करून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. रात्री जेव्हा महिलेचा नवरा आणि सासू घरी परत आले तेव्हा पीडितेने रडत रडत आपल्यासोबत घडलेला प्रकार त्यांना सांगितला. मंगळवारी सकाळी पीडितेच्या कुटुंबीयांनी नौबतपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. (house) घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. पोलिसांनी सांगितले की, वैद्यकीय अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

तर दुसरीकडे बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील मझौलिया पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला. सोमवारी संध्याकाळी एका अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने अपहरण करून तिला मक्याच्या शेतात नेण्यात आले. आरोपीने तिचे हात-पाय आणि तोंड बांधून तिच्यावर बलात्कार केला. (house) यावेळी आरोपीचे दोन मित्र घटनास्थळावरच होते. पीडितेच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला असता मक्याच्या शेतामध्ये ती सापडली. या प्रकरणी त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत मुख्य आरोपीला अटक केली. तर इतर दोघांचा शोध सुरू आहे.

हेही वाचा

हिंदू तरूणीचे अपहरण, ५ दिवस घरात डांबून ठेवले; ‘लव्ह जिहाद’ने महाराष्ट्र हादरला

 बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! MHT CET परीक्षांच्या तारखा जाहीर

AIमुळे बँकांमध्ये नोकर कपात? जगावर बेरोजगारीचं सावट