भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) परदेशात ठेवलेले १०४.२३ मेट्रिक टन सोने भारतात परत आणण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हे सोने आता देशातील सुरक्षित तिजोरीत ठेवण्यात आले असून या निर्णयाची देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, या निर्णयानंतर (abroad to India) सोन्याचे दर कमी होतील का, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

आरबीआयच्या ताज्या अहवालानुसार, देशाच्या एकूण सोन्याच्या साठ्यात कोणताही मोठा बदल झालेला नाही. सप्टेंबर २०२५ मध्ये भारताकडे ८८०.१८ मेट्रिक टन सोन्याचा साठा होता, जो मार्च २०२६ मध्ये किंचित वाढून ८८०.५२ मेट्रिक टन इतका झाला आहे. म्हणजेच सोने वाढवण्यापेक्षा साठवणुकीचे ठिकाण बदलण्यावर भर देण्यात आला आहे.
आरबीआयच्या धोरणानुसार, काही प्रमाणात सोने परदेशात ठेवले जाते. त्यामागे महत्त्वाचे आर्थिक कारण असते. गरज पडल्यास हे सोने त्वरित गहाण ठेवून परकीय चलन, विशेषतः डॉलर, उपलब्ध करता येतात. त्यामुळे देशाच्या आर्थिक स्थैर्याला मदत होते. दुसरीकडे, काही सोने देशात ठेवल्याने राष्ट्रीय नियंत्रण अधिक मजबूत राहते.
मात्र, परदेशातील सोने भारतात परत आणल्याने सोन्याच्या किमती स्वस्त होतील, अशी अपेक्षा ठेवणे योग्य ठरणार नाही. कारण आरबीआयने नवीन सोने खरेदी केलेले नाही किंवा बाजारात विक्रीही केलेली नाही. फक्त आधीपासून असलेला साठा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आला आहे.
तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, डॉलरचा दर, महागाई, व्याजदर आणि जागतिक आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतात. त्यामुळे आरबीआयच्या या निर्णयाचा सोन्याच्या किरकोळ बाजारभावावर थेट परिणाम होण्याची शक्यता नाही. मात्र, देशाच्या आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
हेही वाचा
मुख्यमंत्री फडणवीसांनी द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची मागितली माफी
मोठी बातमी! आधार कार्डमधील नाव, पत्ता अपडेटसाठी मोजावे लागतील पैसे, किती असणार शुल्क?
गॅसनंतर पेट्रोल-डीझेल महागणार; राहुल गांधींची भविष्यवाणी, मोदी सरकारवर हल्लाबोल