Petrol-Diesel Price: LPG च्या किमती गगनाला भिडल्यानंतर, आता इंधनाचा नंबर? जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेचे महाराष्ट्रातील दर

एलपीजी सिलेंडरच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत असतानाच आता पेट्रोल आणि डिझेल दरवाढीची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील पाच ते सात दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांचे लक्ष आता इंधन दरांकडे लागले आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाला दोन महिने पूर्ण झाले असून त्याचे परिणाम आता भारतात स्पष्टपणे जाणवू लागले आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. (petrol and diesel) युद्ध सुरू होण्यापूर्वी प्रति बॅरल कच्च्या तेलाचा दर 70 ते 75 डॉलरच्या दरम्यान होता. मात्र गेल्या दोन महिन्यांत हा दर 125 डॉलरपर्यंत पोहोचला. 2 मे रोजी किंमतींमध्ये थोडी घसरण झाली असली तरी दर अजूनही 108 डॉलरच्या वर कायम आहे.

या पार्श्वभूमीवर भारतातील एलपीजी दरांमध्ये सलग वाढ झाली आहे. फेब्रुवारीनंतर केवळ दोन महिन्यांत चार वेळा एलपीजी सिलेंडर महाग झाला आहे. 1 मे 2026 पासून 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत तब्बल 993 रुपयांची वाढ करण्यात आली. दिल्लीत या सिलेंडरची किंमत 3000 रुपयांच्या पुढे गेली आहे. 5 किलोचा मिनी सिलेंडरही महाग झाला आहे. घरगुती सिलेंडरच्या दरात सध्या वाढ करण्यात आलेली नसली तरी लवकरच त्यातही बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कमर्शियल सिलेंडरनंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची चर्चा सुरू झाली आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत दरवाढीचा निर्णय होऊ शकतो. (petrol and diesel) मागील चार वर्षांपासून किरकोळ इंधन दर तुलनेने स्थिर ठेवण्यात आले होते, मात्र सध्याच्या परिस्थितीत ते कायम ठेवणे कठीण मानले जात आहे. होर्मुज सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळे जागतिक पुरवठा साखळीवर दबाव निर्माण झाला आहे. संघर्ष अद्याप संपण्याची चिन्हे नसल्याने पुढील पाच ते सात दिवसांत इंधन दरांबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर 103 ते 105 रुपयांच्या दरम्यान आहेत. मुंबईत पेट्रोल 103.54 रुपये, पुण्यात 104.44 रुपये, नागपुरात 104.43 रुपये, नाशिकमध्ये 104.34 रुपये, औरंगाबादमध्ये 105.08 रुपये, कोल्हापुरात 104.60 रुपये, तर साताऱ्यात 105.05 रुपये प्रति लिटर इतके नोंदवले गेले आहेत. (petrol and diesel) त्यामुळे आगामी दिवसांत आणखी वाढ झाल्यास सर्वसामान्यांवर महागाईचा ताण वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

मुख्यमंत्री फडणवीसांनी द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची मागितली माफी

मोठी बातमी! आधार कार्डमधील नाव, पत्ता अपडेटसाठी मोजावे लागतील पैसे, किती असणार शुल्क?

 गॅसनंतर पेट्रोल-डीझेल महागणार; राहुल गांधींची भविष्यवाणी, मोदी सरकारवर हल्लाबोल