महिलांमध्ये मेनोपॉज लवकर येण्याचं प्रमाण वाढत असल्याचं (menopause) चिंताजनक चित्र सध्या समोर येत आहे. साधारणतः ४५ ते ५० वयोगटात होणारी ही नैसर्गिक प्रक्रिया आता अनेक महिलांमध्ये ३५ ते ४० वयोगटातच सुरू होत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. बदललेली जीवनशैली, ताणतणाव, अयोग्य आहार, झोपेचा अभाव आणि हार्मोन्समधील असंतुलन ही यामागची प्रमुख कारणं मानली जात आहेत.

मेनोपॉज लवकर येण्याआधी शरीर काही संकेत देत असतं. (menopause)मासिक पाळी अनियमित होणे, अचानक गरम होणे हॉट फ्लॅशेस, चिडचिड, झोप न लागणे, थकवा, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे आणि मनःस्थितीत वारंवार बदल होणे ही काही महत्त्वाची लक्षणं आहेत. अनेकदा महिलांकडून ही लक्षणं दुर्लक्षित केली जातात, मात्र वेळेत याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे.
तज्ज्ञांच्या मते, नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप (menopause) आणि ताण नियंत्रणात ठेवणं यामुळे मेनोपॉजची प्रक्रिया नैसर्गिकरीत्या आणि कमी त्रासदायक होऊ शकते. तसेच कोणतीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. महिलांनी स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहून योग्य वेळी पावलं उचलली तर भविष्यातील गुंतागुंत टाळता येऊ शकते.
हेही वाचा
मुख्यमंत्री फडणवीसांनी द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची मागितली माफी
मोठी बातमी! आधार कार्डमधील नाव, पत्ता अपडेटसाठी मोजावे लागतील पैसे, किती असणार शुल्क?
गॅसनंतर पेट्रोल-डीझेल महागणार; राहुल गांधींची भविष्यवाणी, मोदी सरकारवर हल्लाबोल