खेळ जगतातून एक अचानक वाईट बातमी समोर आली असून यामुळे (sports)संपूर्ण क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. प्लॅन क्रॅशमध्ये काही धुरंदर खेळाडू मारले गेले असून टेक्सासच्या हिल कंट्री भगत विंबर्लीजवळ 30 एप्रिलच्या रात्री हा विमान अपघात झाला. यात एका लहान विमानाचा अपघात झाला असून यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या विमानातून पिकल बॉलचे स्टार खेळाडू सुद्धा प्रवास करत असल्याची माहिती आहे. संबंधित अपघाताचं कारण जाणून घेण्यासाठी सध्या अनेक एजन्सी काम करत असून अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री 11:05 वाजता आपात्कालीन टीमला इथे विमान क्रॅश झाल्याची माहिती मिळाली.

अपघात झालेलं विमान हे सेसना 421सी असल्याचं सांगितलं जात असून (sports)यात एकूण पाच जण असल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानातून प्रवास करणाऱ्या या सर्व जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना विंबर्लीजवळ झाली असून हे 3 हजार लोकसंख्या असलेलं छोटंसं शहर आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघात झाल्यावर लगेचच बचाव कार्यासाठी पोलीस, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका अपघाताच्या ठिकाणी पोहोचल्या होत्या आणि शुक्रवार सकाळपर्यंत इथे बचाव कार्य सुरु होते. मिळालेल्या माहितीनुसार सध्यस्थितीत निष्कर्षांच्या आधारावर सदर विमानाचा अपघात हवेत कोणत्याही इतर विमानाची टक्कर होऊन झालेला नाही.
एक दुसरा विमान सुद्धा त्याचवेळी त्या भागातून उडत होता. (sports)मात्र ते विमान सुरक्षितपणे लँड झालं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे अद्याप स्पष्ट नाही की ही दोन्ही विमान सोबत उडत होते की नाही, तसेच या गोष्टीची सुद्धा अद्याप माहिती मिळाली नाही की या दोन विमानांनी नेमकं कुठून उड्डाण केलं होतं. फेडरल एविएशन एडमिनिस्ट्रेशन आणि नॅशनल ट्रांसपोर्टेशन सेफ्टी बोर्ड यांना या विमान अपघाताची माहिती देण्यात आली असून ते याबाबत तपास करत आहेत. अधिकाऱ्यांनी अद्याप या विमान अपघातात मृत्यू झालेल्या लोकांची ओळख सार्वजनिक केलेली नाही. सांगितलं जातंय की त्यांच्या कुटुंबाला माहिती दिल्यावरच या संबंधित माहिती समोर आणली जाईल.
हेही वाचा
मुख्यमंत्री फडणवीसांनी द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची मागितली माफी
मोठी बातमी! आधार कार्डमधील नाव, पत्ता अपडेटसाठी मोजावे लागतील पैसे, किती असणार शुल्क?
गॅसनंतर पेट्रोल-डीझेल महागणार; राहुल गांधींची भविष्यवाणी, मोदी सरकारवर हल्लाबोल