Pandharpur शहरात एका २८ वर्षीय तरुणीवर अॅसिडसदृश्य रसायन फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वैष्णवी भागवत असे जखमी तरुणीचे नाव असून तिच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी घरातून भेळ आणण्यासाठी बाहेर पडली होती. (shocking incident) नगरपालिका इमारतीजवळून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी तिच्या चेहऱ्यावर अॅसिडसारखा पदार्थ फेकला आणि तेथून पळ काढला. अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरलेल्या वैष्णवीने जवळच्या बाजारपेठेतील एका दुकानदाराचा मोबाईल वापरून घरच्यांना घटनेची माहिती दिली.
कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तिची रुग्णालयात ने-आण केली. या हल्ल्यात तिच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून डॉक्टरांकडून तिच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे, मात्र ती अद्याप निरीक्षणाखाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली असून पीडितेच्या आईचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
या घटनेबाबत बोलताना पीडितेच्या आईने अत्यंत भावनिक प्रतिक्रिया दिली. “माझ्या मुलीवर जे झालं, तसं कुणावरही होऊ नये. कुणीही अशा प्रकारचं कृत्य करू नये,” असे आवाहन त्यांनी केले. योगायोगाने याच दिवशी Eknath Shinde यांचा पंढरपुरात दौरा असताना ही घटना घडल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकारामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांकडून कडक कारवाईची मागणी होत आहे.
हे ही वाचा;
एसटी प्रवास महागणार, हंगामी वाढ १५ एप्रिलपासून; किती रुपयांनी वाढले आकडेवारी आली
सहलीला गेली अन् घात झाला, 15 वर्षांच्या मुलीचा दरीत सापडला मृतदेह, पालकांनो ‘या’ 5 चुका टाळा
८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, कोणत्या फॉर्म्युलानुसार पगार किती रुपायांनी वाढणार?