आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानसमोर पुन्हा एकदा मोठं आर्थिक संकट उभं ठाकलं आहे. संयुक्त अरब अमिराती (युएई) कडील तब्बल 3.5 अब्ज डॉलर्सचं कर्ज एप्रिल अखेरपर्यंत फेडण्याचं आव्हान पाकिस्तानसमोर आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने मदतीसाठी सौदी अरेबिया आणि कतार या देशांकडे धाव घेतली आहे.

या संदर्भात इस्लामाबादमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. (financial) या बैठकीला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, परराष्ट्र मंत्री इशाक दार आणि लष्करप्रमुख असीम मुनीर उपस्थित होते. तसेच सौदीचे अर्थमंत्री मोहम्मद बिन अब्दुल्ला अल-जदान यांचीही उपस्थिती होती. या चर्चेनंतर सौदी अरेबिया आणि कतारकडून मिळणारी आर्थिक मदत ‘स्टेट बँक ऑफ पाकिस्तान’मध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानची सध्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट मानली जात आहे. वाढत्या आयात खर्चामुळे परकीय चलन साठ्यावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. सध्या पाकिस्तानचा परकीय चलन साठा सुमारे 16.4 अब्ज डॉलर्स इतका असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, नव्या आर्थिक मदतीशिवाय हा साठा लवकरच आणखी घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर सौदी अरेबिया आणि कतारकडून मिळणारे सुमारे 5 अब्ज डॉलर्स पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. या निधीच्या मदतीने पाकिस्तानला युएईचे कर्ज फेडणे आणि देशाची आर्थिक स्थिती काही प्रमाणात स्थिर ठेवणे शक्य होऊ शकते. दरम्यान, परकीय चलन साठ्यावरील ताण कमी करण्यासाठी पाकिस्तान अमेरिकेकडेही आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त करणार असल्याची माहिती आहे.
एकूणच, सततच्या कर्जांवर चालणारी अर्थव्यवस्था आणि वाढत चाललेली आर्थिक गरज यामुळे पाकिस्तानसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. बाह्य मदतीवर अवलंबून राहण्याची ही परिस्थिती दीर्घकाळ टिकणारी नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
हे ही वाचा;
एसटी प्रवास महागणार, हंगामी वाढ १५ एप्रिलपासून; किती रुपयांनी वाढले आकडेवारी आली
सहलीला गेली अन् घात झाला, 15 वर्षांच्या मुलीचा दरीत सापडला मृतदेह, पालकांनो ‘या’ 5 चुका टाळा
८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, कोणत्या फॉर्म्युलानुसार पगार किती रुपायांनी वाढणार?