ममता बॅनर्जींनतर पश्चिम बंगालला मिळणार दुसरी महिला मुख्यमंत्री

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या (woman) राजकारणात मोठे बदल घडताना दिसत आहेत. भाजपने ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नेत्या अग्निमित्रा पॉल यांना अचानक दिल्लीत बोलावण्यात आल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे.सुरुवातीला मुख्यमंत्रीपदासाठी सुवेंदू अधिकारी यांचे नाव आघाडीवर मानले जात होते. मात्र, पॉल यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे समीकरणे बदलू लागल्याचे दिसत आहे. पक्षातील इतर दिग्गज नेते जसे दिलीप घोष, रूपा गांगुली आणि शमिक भट्टाचार्य यांच्या नावांसोबत आता पॉल यांचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.महिला नेतृत्वाला पुढे करण्याचा प्रयोग भाजपकडून पुन्हा केला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

ममता बॅनर्जी यांच्या प्रभावाला तोड देण्यासाठी एक मजबूत महिला (woman)चेहरा उभा करण्याची रणनीती आखली जात असल्याचे संकेत आहेत. राज्यातील महिला मतदारांचा प्रभाव लक्षात घेता हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो.अग्निमित्रा पॉल यांनी आसनसोल दक्षिण मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यांच्या प्रचारशैलीत आक्रमकता आणि प्रभावी संवाद कौशल्य दिसून आले, ज्यामुळे त्या पक्ष नेतृत्वाच्या अधिक जवळ गेल्या आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या सभांमध्ये त्यांनी केलेले सूत्रसंचालनही चर्चेत राहिले.

राजकारणात येण्यापूर्वी त्या एक यशस्वी फॅशन डिझायनर म्हणून (woman) ओळखल्या जात होत्या. श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांसोबत त्यांनी काम केले आहे. 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी अल्पावधीतच आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.दरम्यान, पराभवानंतरही ममता बॅनर्जी यांनी संघर्ष सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे बंगालमध्ये राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भाजपकडून आक्रमक आणि जनतेशी जोडलेला चेहरा पुढे करण्यावर भर दिला जात आहे.दिल्लीतील बैठकीनंतर लवकरच मुख्यमंत्रीपदासाठी अंतिम नाव जाहीर होण्याची शक्यता असून, बंगालच्या राजकारणात नव्या अध्यायाची सुरुवात होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार

महाराष्ट्रात संतापजनक प्रकार! भोंदूच्या नावाखाली १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; उपचाराच्या बहाण्याने

नसरापूर प्रकरण 2 प्रकरणातून निर्दोष सुटका होताच आरोपीने केली भयंकर गोष्ट, ज्यामुळे तपासात अडथळे