अकोला सिव्हिल लाइन्स परिसरातील सहा वर्षीय मुलीवर अत्याचार; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल, आरोपीला बालसुधारगृहात पाठवले.

सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा वर्षीय मुलीवर लैंगिक (Girl) अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
१२ एप्रिल रोजी घडलेली ही घटना उशिराने समोर आली असून, ९ मे रोजी पीडितेच्या आईने अधिकृत तक्रार दाखल केली. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १२ एप्रिल २०२६ रोजी पीडित मुलीची आई कामावरून घरी परतल्यानंतर मुलीने रडत रडत आपल्यावर अत्याचार झाल्याची माहिती आईला दिली होती.दुपारच्या सुमारास घरात कोणी नसल्याचा फायदा घेत शेजारी राहणाऱ्या नातेवाईकाच्या मुलाने हा प्रकार केल्याचे मुलीने सांगितले होते. (Girl) घटना ऐकल्यानंतर कुटुंबीयांना धक्का बसला. प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर पीडितेची आई तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेली होती.
मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यावेळी तक्रार नोंदवता आली नाही. अखेर ९ मे रोजी मुलीला सोबत घेऊन त्यांनी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(फ) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ३, ४, ५(एम), ५(एन) आणि ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित विधिसंघर्षग्रस्त बालकाला त्याच्या पालकांसह चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले. (Girl) आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले. प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक मालती कायते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तनुजा खोब्रागडे करीत आहेत.
हेही वाचा
कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट
महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?