सतत होणाऱ्या पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करताय? या गंभीर समस्येचं आहे लक्षण

ऑफिसमध्ये आपण बरेच तास एकाच ठिकाणी बसून काम करतो.(symptom)यामुळे वजनात तर वाढ होतेच शिवाय पाठदुखीचा त्रासही होऊ लागतो. पाठीचं दुखणं आलं की आपण एखादी पेनकिलर किंवा क्रिम लावून त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र असं करणं महागात पडू शकतं. पण ही साधी वाटणारी समस्या कधी कधी शरीर देत असलेल्या गंभीर इशाऱ्याचं रूपही असू शकते.पाठदुखीची कारणं ही चुकीचं पोश्चर, जास्त वेळ बसून काम करणं किंवा जास्त प्रमाणात व्यायाम करणं ही मानली जातात. अनेक वेळा याच गोष्टी कारणीभूत असतात. मात्र काही वेळा हा त्रास फक्त स्नायूंशी संबंधित नसून शरीरातील इतर गंभीर समस्यांकडे इशारा करतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही वेळा तुम्हाला होणारी पाठदुखी ही किडनीचे आजारही दर्शवते.

डॉक्टर सांगतात की, प्रत्येक पाठदुखी सारखी नसते.(symptom) स्नायूंशी संबंधित वेदना हालचालींमुळे वाढतात आणि विश्रांती घेतल्यावर कमी होतात. गरम पाण्याची पट्टी किंवा स्ट्रेचिंग केल्यावरही तुम्हाला आराम मिळतो. पण किडनीशी संबंधित वेदना शरीराच्या आत खोलवर जाणवतात. या वेदना हालचालींनी वाढत नाहीत आणि विश्रांती घेतली तरी सहज कमी होत नाही. हाच फरक ओळखणं खूप महत्त्वाचं ठरतं.

डॉ. रतन झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाठदुखी हळूहळू सुरू झाली तर अनेक जण ती स्नायूंची समस्या समजून दुर्लक्ष करतात. मात्र किडनीशी संबंधित वेदना वेगळ्या प्रकारे असतात हे समजून घेणं गरजेचं आहे.किडनीशी संबंधित आजार सुरुवातीला फार ठळक लक्षणं दाखवत नाहीत. हे त्रास हळूहळू वाढतात. यामध्ये लघवीच्या सवयींमध्ये बदल होणं, लघवी करताना जळजळ होणं, लघवीचा रंग गडद होणं किंवा डोळे आणि पायांच्या आसपास सूज दिसणं हे संकेत असू शकतात.

डॉ. हिमा दीप्ती अल्ला यांच्या मते, किडनीशी संबंधित वेदना नेहमी तीव्र असतील असं नाही.(symptom) अनेकदा या वेदना कंबरेत किंवा बाजूला सतत जाणवत राहतात. लोक याला बसण्याची चुकीची सवय किंवा थकवा समजून दुर्लक्ष करतात.नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या आकडेवारीनुसार, गंभीर स्वरूपातील किडनी डिजीज सुरुवातीच्या टप्प्यात निदान होणं कठीण असतं. कारण त्याची लक्षणं खूप सौम्य असून किंवा स्पष्ट नसतात.

हेही वाचा

१८० मुलींचे लैंगिक शोषण, आरोपी निघाला MIM चा नेता

दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! उद्या १० वीचा निकाल लागणार?

अविवाहितांना कॅन्सरचा धोका ८५% जास्त; रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर