कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी स्त्रियांसाठी शिक्षणाची कवाडे उघडणाऱ्या (bicentenary)महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्माच्या द्वि शताब्दी वर्षात महाराष्ट्र पोहोचला आहे. संसदेत नारीशक्ती वंदन विधेयकावर चर्चा सुरू झाली आहे. आणि याच दरम्यान महाराष्ट्रात महिला लैंगिक शोषण, महिला लव्ह जिहाद तथा धर्मांतर प्रकरण, अमरावती जिल्ह्यातील परतवाडा युवती लैंगिक शोषणकांड अशा स्त्रीविषयक घडलेल्या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. नवी दिल्लीत स्त्रीच्या सन्मानाची सर्वपक्षीय पातळीवर चर्चा सुरू असताना स्त्रीच्या चारित्र्यावर दरोडे घालून स्त्रीत्वाची मानखंडना सुरू आहे. ही गृहमंत्रालयाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी केवळ बाब नव्हे तर महाराष्ट्राच्या सामूहिक लाजेची घृणास्पद गोष्ट आहे. अगदी सुरुवातीला महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना घडली ती नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव या गावात. स्वतःला कॅप्टन समजणाऱ्या अशोक खरात या भोंदूबाबा ने स्त्रियांच्या मानसिक कमजोरीचा गैरफायदा घेऊन अनेक महिलांवर बलात्कार करताना इतरही अत्याचार केले. या भोंदू बाबाला काही राजकीय नेत्यांची प्रभावळ लाभल्यामुळे हे प्रकरण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात गाजत आहे.

खरात प्रकरणांमध्ये त्याच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या (bicentenary)असहाय महिलांनाच काहीजण आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करताना दिसत आहेत. सुबोध सावजी यांनी तर या विषयावर भाष्य करताना अकलेचे तारे तोडले आहेत.बळी पडलेल्या स्त्रिया या स्वतःहून खरात कडे गेल्या होत्या. त्यांची नावे जाहीर केली पाहिजेत इतकेच नाही तर त्यांच्यावर गुन्हेही दाखल केले पाहिजेत असे वक्तव्य करणाऱ्या सुबोध सावजी यांच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण त्यांनी, मानसिक दृष्ट्या खचलेल्या संबंधित महिलांचा एक प्रकारे शाब्दिक विनयभंग केला आहे. नाशिक येथीलच टीसीएस या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपनीमध्ये लव्ह जिहादच्या माध्यमातून धर्मांतर घडवून आणण्याचे महाभयंकर प्रकरण उघडकीस आले आहे. हा एक प्रकारचा दहशतवादच असल्याचे समजून या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी, संबंधित कार्पोरेट कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधितांच्या वर राष्ट्र द्रोहाचा पुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारच्या मागण्या जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून केल्या गेल्या आहेत. या कंपनीमधील एक वरिष्ठ अधिकारी असलेली निदा खान ही सध्या फरार आहे.
नवी दिल्लीत लाल किल्ला परिसरात आत्मघातकी स्फोट घडवून (bicentenary)आणणाऱ्या दहशतवादी गटाशी ती संबंधित असावी या संशयावरून एटीएस कडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. कार्पोरेट कंपनीमध्ये लव जिहाद आणि धर्मांतर घडवून आणण्याचे एक रॅकेट गेल्या काही महिन्यांपासून सक्रिय होते ही घटनाच महाराष्ट्राला बधिर करणारी आहे. नाशिक मधील आपल्या कंपनीच्या कार्यालयात अशा प्रकारचे काहीतरी गंभीर आणि भयानक घडते आहे याची भनक कंपनीच्या प्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांना लागू नये हे आश्चर्यकारक आहे. आता हे एकूण प्रकरण केंद्र शासनाच्या तपास यंत्रणांनी अतिशय गांभीर्याने घेतलेले आहे. महाराष्ट्राच्या बाहेरही तपासाची व्याप्ती वाढवलेली आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा या गावांमध्ये घडलेल्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. अयाज मोहम्मद तनवीर या नावाच्या विकृत तरुणाने काही साथीदारांच्या मदतीने
100 पेक्षा अधिक हिंदू तरुणींच्या चारित्र्यावर दरोडा टाकला आहे. एका छोट्याश्या गावात घडलेले देशातील हे सर्वात महाभयंकर प्रकरण आहे.
180 तरुणींच्यावर यातील संशयित आरोपींनी कधी दहशत घालून तर कधी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार केले आहेत. तपास करणाऱ्या पोलिसांनी 39 व्हिडिओ आणि 18 फोटो आत्तापर्यंत जप्त केले आहेत. अशोक खरात या भोंदू बाबाच्या विरुद्ध अतिशय संतप्त होऊन व्यक्त होणाऱ्या राजकीय नेत्यांचे कौतुकच केले पाहिजे. तथापि नाशिकच्या कार्पोरेट कंपनीमध्ये तसेच अमरावतीच्या परतवाडा गावांमध्ये घडलेल्या घटनांचा पुढे होऊन कुणीतरी निषेध केला आहे असे घडलेले दिसत नाही. एका हिंदुत्ववादी संघटनेचे अर्थात शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून दररोज व्यक्त होणाऱ्या खासदार संजय राऊत यांनीही या दोन घटनांना पद्धतशीरपणे बे दखल केलेले दिसते. शरद पवार यांनी तर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मात्र याच दरम्यान त्यांनी महिला अधिकारी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने स्मरणिकेमध्ये एक लेख लिहून वारकरी संप्रदायामध्ये 60% पेक्षा अधिक लोक हे प्रतिगामी आहेत आणि ही मंडळी धर्मांध लोकांना बळ देतात असे लिखाण करून
चर्चेचा धुरळा उडवून दिला आहे. स्त्रियांची अगदी ठरवून पद्धतशीरपणे विटंबना केली जाते, त्यांची अप्रतिष्ठा केली जाते यावर मात्र त्यांनी आत्तापर्यंत भाष्य केलेले नाही. शरद पवार यांच्याप्रमाणेच आणखीही काही राजकीय मंडळी आहेत की त्यांनी या संदर्भात बोलणे टाळलेले आहे.
हेही वाचा
धक्कादायक! तक्रारदार महिलेकडे शरीरसुखाची मागणी, पोलिसाच्या कृत्याने संताप
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा धुरळा उडणार, विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक
करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! आयटीआर फॉर्म भरण्याच्या नियमात मोठे बदल