उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये केस सतत तेलकट किंवा चिकट होत असतील तर केसांची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. अन्यथा केस खूप जास्त कोरडे आणि निस्तेज होतील. जाणून घ्या उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी.

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सतत येणाऱ्या घामामुळे त्वचेसोबतच केस सुद्धा पूर्णपणे चिकट होऊन जातात. घाम आल्यानंतर केस ओले होऊन जातात आणि केसांमध्ये ओलावा तसाच राहिल्यामुळे केस चिकट किंवा तेलकट होऊन जातात. केस तेलकट झाल्यानंतर उन्हात किंवा इतर कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर केसांमध्ये धूळ, माती तशीच साचून राहते. घामामुळे टाळूवर तेलकटपणा वाढल्यास फंगल इन्फेक्शन किंवा कोंडा होण्याची जास्त शक्यता असते. केसांमध्ये झालेल्या कोंड्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होते आणि केस निर्जीव होऊन जातात. (summer) त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये केसांची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. उन्हाळ्यात केस स्वच्छ करण्यासाठी वारंवार वेगवेगळ्या शाम्पू आणि कंडिशनरचा वापर केला जातो. पण केमिकल युक्त प्रॉडक्टचा खूप जास्त वापर केल्यामुळे केस गळण्याची शक्यता असते.

उन्हाळ्यात तेलकट किंवा चिकट झालेले केस एक दिवस आड करून स्वच्छ केले जातात. पण चुकीच्या पद्धतीने केस स्वच्छ केल्यास कोणताच परिणाम दिसून येणार नाही. केसांमधील चिकटपणा कमी करण्यासाठी केवळ केमिकल प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती उपाय सुद्धा करावेत. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये केसांची काळजी कशा पद्धतीने घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पद्धतीने केसांची काळजी घेतल्यास तुमचे केस अजिबात चिकट किंवा तेलकट होणार नाहीत. केस कायमच मुलायम राहतील.

सर्वच महिलांना कायमच आपले केस खूप सुंदर आणि चमकदार हवे असतात. केसांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या ट्रीट्मेंट घेतल्या जातात. पण याचा फारसा परिणाम केसांवर दिसून येत नाही. उन्हाळ्यात किंवा इतर दिवसांमध्ये केस धुतल्यानंतर ते लगेच बांधू नये. (summer) यामुळे टाळूमध्ये ओलावा आणि उष्णता कायम टिकून राहते. ओले केस तसेच बांधल्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि कोंडा वाढण्याची जास्त शक्यता असते.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये टाळूवर वाढलेला तेलकटपणा कमी करण्यासाठी सतत शाम्पूचा वापर केला जातो. पण वारंवार केलेल्या शाम्पूच्या वापरामुळे केस कोरडे होतात. केस शाम्पूने धुतल्यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल नष्ट होऊन जाते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर सेवन करावे. थंड पदार्थ खाल्ल्यास शरीरात उष्णता वाढणार नाही आणि केस सुद्धा मुलायम होतील.

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊन जाते. ज्याच्या परिणामामुळे खूप जास्त थकवा वाढतो. त्यामुळे या दिवसांमध्ये भरपूर पाणी आणि थंड पदार्थांचे सेवन करावे. शरीरात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी भिजवलेले काळे मनुके, खजूर, तीळ इत्यादी पदार्थांचे सेवन करावे आणि शरीर थंड ठेवण्यासाठी आहारात कलिंगड, टरबूज खावा.

केसांच्या वाढीसाठी कायमच केमिकलयुक्त हेअर केअरचा वापर करण्याऐवजी भृंगराज, ब्राह्मी, शिकाकाई आणि आवळा इत्यादी नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा. (summer)यामुळे केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी होण्यास मदत होते. रात्री उशिरापर्यंत जगल्यामुळे सुद्धा केसांच्या वाढीवर परिणाम दिसून येतात. त्यामुळे केसांची खूप जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एकाचवेळी ४५०० रुपये! ‘ई-केवायसी’ न केलेल्यांना मिळणार नाही लाभ; अधिकाऱ्यांनी सरकारकडे ‘ही’ विनंती, वाचा…

कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट

महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?