ठाकरे गटातून तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. लोकसभा अध्यक्षांची भेट घेत त्यांनी स्वतंत्र गट(Thackeray) स्थापनेबद्दलचे पत्र दिले. त्यानंतर यांनी मुंबईत दाखल होत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का होता. 6 खासदारानंतर सचिन आहिर यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली. या 6 खासदारांपैकी एक ओमराजे निंबाळकर देखील होते. ओमराजे निंबाळकर यांनीही मोठी बंडखोरी केली. उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानतंर ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.

त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून टार्गेट करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी (Thackeray) ओमराजे निंबाळकर यांच्या मतदार संघात सभा घेतली आणि त्यांच्यावर जोरदार टीका केली. यादरम्यानच आता ओमराजे निंबाळकर त्यांच्या मतदार संघात सक्रिय झाले.शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून स्थानिक राजकारणात मोठी खेळी करण्यात आली.
एकीकडे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटलांना कडाडून विरोध(Thackeray) तर दुसरीकडे भाजप नेत्यांच्या खासदार ओमराजे निंबाळकरांकडून गाठीभेटी सुरू आहेत. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आले.फक्त भाजपा नेतेच नाही तर ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या देखील भेटी घेतल्या आहेत.
भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, (Thackeray) माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शेषाद्री अण्णा डांगे यांचीही भेट ओमराजे निंबाळकर यांनी घेतली. ही सदिच्छा भेट होती.यादरम्यानच ओमराजे निंबाळकर यांनी फेसबुकवर एक पोस्टही शेअर केली. ओमराजे निंबाळकर यांनी पोस्टमध्ये म्हटले की, माझा विरोध कोणत्याही पक्षाला नाही तर राजकारणातील नीच प्रवृत्ती द्वेषाचे राजकारण आणि समाजहिताचा बाद आणणाऱ्या वृत्तीला आहे
भाजप नेत्याच्या भेटीनंतर ओमराजे निंबाळकर यांनी (Thackeray) अशाप्रकारची ही एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट ओमराजे निंबाळकर यांनी घेतली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ओमराजे निंबाळकर यांच्याकडून धाराशिव जिल्ह्यातील भाजपा नेत्यांच्या भेटी घेतल्या जात आहेत. मात्र, भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या कुटुंबासोबत संघर्ष कायम राहणार असल्याचेही यावरून स्पष्ट दिसत आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना शिंदे गटातील पक्षप्रवेशानंतर धाराशिव जिल्ह्यातील सर्वच राजकीय समीकरणे बदलली आहेत.
हेही वाचा :
कमी वयात केस पांढरे होतायेत? 5 कारणे ठरू शकतात जबाबदार?
क्रिकेट विश्वात खळबळ इंग्लंड पराभवानंतर गंभीरसमोर ‘संजू’च्या घोषणा?
पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान?Edit