राजस्थान रॉयल्सने मंगळवारच्या सामन्यात पंजाब किंग्सचा ६ विकेट्सने पराभव करत शानदार विजय मिळवला, मात्र या सामन्यानंतर चर्चेचा विषय ठरला (discussion) तो संघाचा कर्णधार रियान पराग. मैदानावरील खेळीपेक्षा ड्रेसिंग रूममधील त्याच्या एका कृतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या हायस्कोअरिंग सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद २२२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने १९.२ षटकांत ४ विकेट्स राखून २२८ धावा करत विजय मिळवला. मात्र राजस्थानच्या डावादरम्यान ब्रॉडकास्ट कॅमेऱ्याने रियान परागला ड्रेसिंग रूममध्ये व्हेपसारखे दिसणारे उपकरण वापरताना कैद केले.
रियान पराग १६ चेंडूंमध्ये २९ धावा करून बाद झाल्यानंतर ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी संताप व्यक्त केला असून त्याच्यावर कारवाईची मागणीही सुरू झाली आहे. अनेकांनी खेळाडूंच्या वर्तनाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून खेळाडूंसाठी ड्रेसिंग रूम आणि डगआऊट परिसरात शिस्तीबाबत कठोर नियम आहेत. आरोग्य आणि सुरक्षा मार्गदर्शक सूचनांनुसार तंबाखूजन्य किंवा संबंधित उत्पादनांच्या वापरास मनाई असल्याचे मानले जाते. त्यामुळे या प्रकरणात रियान परागवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, २०२६ हंगामात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व रियान परागकडे सोपवण्यात आले आहे. संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्समध्ये गेल्यानंतर त्याच्यावर नेतृत्वाची जबाबदारी आली. फलंदाजीत सातत्य नसल्याने तो आधीच टीकेचा धनी ठरला होता. या सामन्यापूर्वी सात डावांत त्याच्या नावावर फक्त ८१ धावा होत्या. अशा परिस्थितीत विजय मिळूनही आता त्याच्या या व्हायरल व्हिडिओमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
हेही वाचा
अरविंद केजरीवाल यांचा …….न्यायासाठी सत्याग्रह ?.
पोलादी सुरक्षा व्यवस्था …..जेव्हा भेदली जाते…
‘राजा शिवाजी’मधील लहान मुलाच्या त्या सीनवर कात्री सेन्सॉर बोर्डाने सुचवले हे मोठे बदल