बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘दृश्यम 3’ संदर्भात मोठी(release) अपडेट समोर आली आहे. अजय देवगण पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी कोणत्याही थराला जाण्यास सज्ज असल्याचं या नव्या टीझरमधून स्पष्ट होत आहे. अजयने स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर केली आहे.अजय देवगणने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘दृश्यम 3’, हा चित्रपट 2026 मध्ये रिलीज होणार आहे. कथा अजून संपलेली नाही. शेवटचा भाग बाकी आहे. ‘दृश्यम 3’ हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी म्हणजेच गांधी जयंतीच्या दिवशी देशभरातील सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे.

‘दृश्यम 3’च्या टीझरमध्ये अजय देवगन पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसतो.(release) या टीझरमध्ये पहिल्या दोन भागांमधील काही महत्त्वाचे सीन दाखवण्यात आले असून, कथानकाची तीव्रता अधिक वाढलेली जाणवते.टीझरमध्ये अजय म्हणतो, ‘जग मला अनेक नावाने ओळखते, पण मला त्याची पर्वा नाही. गेल्या सात वर्षांत जे काही घडले आहे, मी जे काही केले आहे, त्यामुळे मला एक गोष्ट समजली आहे.

या जगात प्रत्येकाचे सत्य वेगळे आहे. प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे.(release) माझे सत्य, माझा अधिकार फक्त माझे कुटुंब आहे.जोपर्यंत प्रत्येकजण थकत नाही, जोपर्यंत प्रत्येकाचा पराभव होत नाही, तोपर्यंत मी येथे उभा राहीन – एका चौकीदाराप्रमाणे, भिंतीप्रमाणे. कारण कथा अजून संपलेली नाही… शेवटचा भाग अजून बाकी आहे.”. या संवादांमधूनच ‘दृश्यम 3’मध्ये पुन्हा एकदा थरार, भावनिक संघर्ष आणि मेंदूला चालना देणारी कथा पाहायला मिळणार असल्याचं स्पष्ट होतं.
हेही वाचा :
नवीन वर्षात गृहिणींना मोठं गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार?
भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना ‘Z+’ सुरक्षा, कारण काय?
‘3 इडियट्स’नंतर आता ‘4 इडियट्स’; आमिर खानच्या चित्रपटात चौथ्या