लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने 19 डिसेंबर 2025 रोजी आपला(party)41 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. या खास दिवशी तिने एक खासगी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत तिचे जवळचे मित्र, कुटुंबीय आणि अनेक टीव्ही सेलिब्रिटी सहभागी झाले होते. पती विक्की जैनसोबत अंकिता पार्टीत अत्यंत आनंदी आणि उत्साही दिसत होती.मात्र, वाढदिवसाच्या या आनंदावर पापाराझींच्या एका कृतीमुळे पाणी फेरलं गेलं. पार्टी सुरू असताना काही पापाराझी थेट पार्टीच्या आत शिरल्याने अंकिता प्रचंड संतापली. तिने पापाराझींवर उघड नाराजी व्यक्त केली.

सध्या सोशल मीडियावर अंकिताचे रागावलेले अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.(party)या व्हिडीओंमध्ये ती पापाराझींना स्पष्ट शब्दांत जाब विचारताना दिसते. ज्यामध्ये पापाराझींना पाहताच अंकिता म्हणते की, ‘तुम्ही आत का आलात?’ यावर एका पापाराझीने, ‘मी नाही, कुणीतरी दुसराच आत आला होता’ असं सांगितल्यावर अंकिता आणखी चिडलेली दिसते आणि म्हणते, ‘हे चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे.’ या दरम्यान विक्की जैनही तिच्यासोबत उपस्थित होता. पापाराझींनी नंतर अंकिताची माफी मागितली, त्यानंतर हे जोडपं पुन्हा पार्टीसाठी आत गेलं.

यानंतर अंकिताने मित्र-परिवारासोबत मनसोक्त पार्टीचा आनंद घेतला.(party)या वाढदिवसाच्या पार्टीत खानजादी, मन्नारा चोप्रा, समर्थ जुरेल, दिव्या अग्रवाल, अपर्णा दीक्षित यांच्यासह अनेक टीव्ही इंडस्ट्रीमधील ओळखीचे चेहरे दिसून आले.
पार्टीदरम्यान झालेल्या गोंधळानंतरही विक्की जैनने सोशल मीडियावर पत्नी अंकितासाठी एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने अंकितावर मनापासून प्रेम व्यक्त केलं. विक्कीने अंकिताला ‘प्रोटेक्टर’ म्हणत ती आपल्या माणसांसाठी नेहमी उभी राहते आणि त्यांचे संरक्षण करते असं नमूद केलं.

हेही वाचा :

नवीन वर्षात गृहिणींना मोठं गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार?

भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना ‘Z+’ सुरक्षा, कारण काय?

‘3 इडियट्स’नंतर आता ‘4 इडियट्स’; आमिर खानच्या चित्रपटात चौथ्या