भारतीय दुचाकी सेगमेंटमध्ये दमदार बाईक ऑफर केल्या जातात. त्यातही सर्वात जास्त मागणी हाय परफॉर्मन्स बाईकला असते. म्हणूनच तर दुचाकी उत्पादक कंपन्या देशात हाय परफॉर्मन्स आणि स्टायलिश बाईक ऑफर करतात. अशीच एक कंपनी म्हणजे Royal Enfield.

रॉयल एनफिल्डच्या(Royal Enfield) बाईक हाय परफॉर्मन्स आणि थोड्या महागड्या किमतीमुळे ओळखल्या जातात. मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे की आज ज्या बाईकची किंमत लाखोंमध्ये आहे तीच किंमत 90 किंवा 80 च्या दशकात किती असेल?
अलिकडेच, भारतातील सर्वात लोकप्रिय बाईकपैकी एक असलेल्या रॉयल एनफील्ड बुलेटचे जुने विक्री बिल व्हायरल होत आहे. त्यात त्यावेळच्या बुलेट 350 ची ऑन-रोड किंमत देखील लिहिली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
Social Media वर व्हायरल होत असलेल्या या रॉयल एनफील्ड बुलेट 350 विक्रीच्या कागदपत्राची तारीख 23 जानेवारी 1986 आहे. त्यावेळी कंपनीचे नाव फक्त एनफील्ड असे होते. हे बिल मेसर्स आरएस इंजिनिअरिंग इंडस्ट्रीजच्या नावाने जारी करण्यात आले होते. बिलमध्ये विकले जाणारे मॉडेल एक स्टॅंडर्ड बुलेट 350 सीसी आहे, जे कंपनीसाठी खूप जुने आणि लोकप्रिय मॉडेल आहे.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या बिलानुसार, ही डीलरशिप झारखंडमधील बोकारो स्टील सिटी येथील कोठारी मार्केटमध्ये असलेल्या संदीप ऑटो कंपनीची होती. बिलात मूळ एनफिल्ड लोगो देखील दिसत आहे. ऑन-रोड किंमत 18,800 इतकी सूचीबद्ध होती, परंतु 250 सूट आणि 150 जोडल्यानंतर, याची अंतिम किंमत 18,700 रुपये झाली. Royal Enfield Bullet 350 ची सध्याची एक्स-शोरूम किंमत 1.62 लाख आहे.
हेही वाचा :
अमित शहांनी राहुल गांधींच्या ‘त्या’ यात्रेची लाजच काढली
‘मग ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू…’, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले मोठे विधान
निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय! ईव्हीएम मशीनमध्ये होणार ‘हा’ बदल!