पाकिस्तानचा मोठा भ्याड हल्ला, सीमेवर प्रचंड तणाव, तब्बल 30 विद्यार्थी जखमी, अफगाणिस्तान..

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमावाद पुन्हा एकदा तीव्र झाला असून दोन्ही देशांमधील तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. (dispute) अफगाणिस्तानने पाकिस्तानवर मोठा हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू झाला असून 70 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे जखमींमध्ये 30 विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने संतापाची लाट उसळली आहे.

अफगाणिस्तान सरकारचे उपप्रवक्ता हमदुल्लाह फितरत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत पाकिस्तानच्या कारवाईचा निषेध केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानच्या लष्कराने असदाबाद आणि मनवर जिल्ह्यातील विविध भागांवर मोर्टार आणि क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने हल्ले केले. या कारवाईत मोठे नुकसान झाल्याचा दावा अफगाणिस्तानकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, पाकिस्तानने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पाकिस्तान सरकारने अधिकृत निवेदनात म्हटले की, त्यांच्या कारवाया गुप्तचर विभागाच्या अचूक माहितीनंतरच केल्या जातात. अफगाणिस्तानचे आरोप निराधार असल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे.
दोन्ही देशांच्या सीमेलगत आधीपासूनच तणावपूर्ण वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानातील एका रुग्णालयावर हल्ला केल्याचा दावा करण्यात आला होता. त्या घटनेत जवळपास 400 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर चीनने दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ताज्या घडामोडींवरून हा प्रयत्न अपयशी ठरल्याचे दिसत आहे.

विशेष म्हणजे पाकिस्तान एकीकडे इराण आणि अमेरिका यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे अफगाणिस्तानसोबतचा संघर्ष वाढवत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पाकिस्तानकडून भारतावरही विविध आरोप करण्यात येत आहेत. भारत आणि अफगाणिस्तानमधील मैत्रीपूर्ण संबंध पाकिस्तानच्या नजरेत कायमच खुपत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या संपूर्ण घडामोडींवर भारत सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे.

हेही वाचा

अरविंद केजरीवाल यांचा …….न्यायासाठी सत्याग्रह ‌?.

पोलादी सुरक्षा व्यवस्था …..जेव्हा भेदली जाते…

‘राजा शिवाजी’मधील लहान मुलाच्या त्या सीनवर कात्री सेन्सॉर बोर्डाने सुचवले हे मोठे बदल