देशभरातील वैद्यकीय शिक्षणाची प्रवेशद्वार मानली जाणारी NEET-UG 2026 परीक्षा १२ मे रोजी होणारी रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अर्थात एनटीएकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला. पेपरफुटीच्या संशयावरून तपास यंत्रणांकडून मिळालेल्या प्राथमिक अहवालानंतर सध्याच्या परिस्थितीत परीक्षा प्रक्रिया सुरू ठेवणे योग्य ठरणार नाही, असे मत व्यक्त करत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाचा फटका देशभरातील सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांना बसला असून अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली आले आहेत. नव्या परीक्षेच्या तारखा, प्रवेशपत्रे आणि सुधारित वेळापत्रक लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.प्राथमिक माहितीनुसार, (NEET-UG 2026) च्या प्रश्नपत्रिकेतील १८० पैकी सुमारे १२५ प्रश्न हे आधी फिरत असलेल्या तथाकथित ‘गेस पेपर’शी साधर्म्य दर्शवणारे असल्याचा दावा समोर आला. विशेषतः भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांतील अनेक प्रश्न जुळल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यानंतर पेपरफुटीची चर्चा सुरू झाली आणि प्रकरणाने गंभीर वळण घेतले.
हे संपूर्ण प्रकरण असा विस्तारले असल्याचे समोर आले आहे. केरळमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने कथित गेस पेपर आपल्या वडिलांना पाठवला होता. संबंधित व्यक्ती राजस्थानमधील Sikar येथे विद्यार्थी वसतिगृह चालवत असल्याचे सांगितले जात आहे. हा पेपर काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याची माहिती मिळताच संशय अधिक गडद झाला.परीक्षेनंतर काही विद्यार्थ्यांनी सीकरमधील उद्योग नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. (NEET-UG 2026) त्यानंतर पुराव्यांसह एनटीएकडे ईमेलद्वारेही माहिती पाठवण्यात आली. सुरुवातीला स्थानिक पातळीवर या तक्रारींकडे गांभीर्याने पाहिले गेले नसल्याचे बोलले जात आहे. मात्र नंतर प्रकरण गंभीर होताच केंद्रीय आणि राज्य यंत्रणा सक्रिय झाल्या.
एनटीएकडून १० मे रोजी तपास सुरू असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली होती. त्यानंतर Rajasthan Special Operations Group ने स्वतंत्र चौकशी सुरू केली. एडीजी विशाल बन्सल यांनी पत्रकार परिषदेत ४१० प्रश्नांच्या गेस पेपरची तपासणी सुरू असल्याचे सांगितले. (NEET-UG 2026) या प्रकरणात सीकर, आणि इतर काही भागांत छापे टाकून चौकशी करण्यात आली आहे.तपास यंत्रणा आता व्हायरल झालेल्या अभ्याससामग्रीचा मूळ प्रश्नपत्रिकेशी थेट संबंध होता का, हे पडताळत आहेत. पेपरफुटी सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून नवीन तारखांची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे.
हेही वाचा
कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट
महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?