कामाचा ताण आणि ऑफिसचा व्याप.. यामुळे अनेकदा थकायला होतं… (home)अशात रोज – रोज डाळ, भात, पोळी आणि भाजी खायला देखील कंटाळा येतो… अशात कायम चविष्ट पदार्थ खायची इच्छा होते… अशात तुम्ही हॉटेल हा पर्याय निवडता… पण घरात देखील तुम्ही शाही बिर्याणीचा आनंद घेऊ शकता. अशा काही बिर्याणीचे प्रकार आहेत, जे तुम्ही त्या घरी बनवू शकता. बिर्याणी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं… अनेकांना बिर्याणी प्रचंड आवडते… ज्यांना नॉनव्हेज आवडतं, त्यांच्यासाठी बिर्याणी म्हणजे… याबद्दल काही बोलायलाच नको… तर भारतात बिर्याणीचे असे पाच प्रकार आहेत… जे लोकप्रिय आहे.. या 5 प्रकारच्या बिर्याणी एकतरी घरी नक्की ट्राय करा…

हैदराबादी बिर्याणी – हैदराबादी बिर्याणी ही दक्षिण भारतीय पदार्थांपैकी एक मानली जाते.(home) ही मुघलाई आणि तेलंगणा शैलीचे एक अद्वितीय मिश्रण आहे. ती तयार करण्यासाठी, कच्चे मांस दही, मसाले आणि लिंबूमध्ये मॅरीनेट केले जाते. यात बासमती तांदूळ वापरला जातो. केवरा आणि केशरचा सुगंध हा त्याचा खास स्वाद आहे, जो त्याला एक शाही चव देतो.

अवधी बिर्याणी – नवाबांचे शहर लखनऊ येथील अवधी बिर्याणी ही स्वादिष्टता आणि सुरेखतेचं प्रतीक आहे. तिची चव इतकी उत्कृष्ट आहे की जगभरातून लोक त्याचा आस्वाद घेण्यासाठी येतात. लखनऊ बिर्याणी सामान्यतः बासमती तांदूळ आणि चिकन किंवा मटण वापरून बनवली जाते.

कोलकाता बिर्याणी – कोलकाता बिर्याणी देखील जगभरात प्रसिद्ध आहे. मांस उकडलेले बटाटे, आणि हलक्या गोड भाताचे मिश्रण ही त्याची खासियत आहे. ही रेसिपी नवाब वाजिद अली शाह यांच्या काळातील आहे. यात मुघलाई चवीसोबत बंगाली टच देखील मिळतो.

मलबारी बिर्याणी – मलबारी बिर्याणी ही केरळची एक खास डिश आहे.(home) ती तिच्या अनोख्या चवीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. ती काळी मिरी, नारळाचे दूध आणि तळलेले कांदे वापरून बनवली जाते. या डिशमध्ये चिकन, मटण किंवा मासे वापरले जातात.

अंबूर बिर्याणी – तामिळनाडूतील अंबूर शहरातील ही बिर्याणी कमीत कमी मसालेदार असते आणि त्यात विशेषतः उकळलेले चिकन किंवा मटण वापरले जाते. बिर्याणीमध्ये सुखे मसाल्यांचा सुगंध आणि थोडासा तिखटपणा याला अद्वितीय बनवतो. तुम्ही ही रेसिपी घरी सहज ट्राय करुन पाहू शकता..

हेही वाचा :

नवीन वर्षात गृहिणींना मोठं गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार?

भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना ‘Z+’ सुरक्षा, कारण काय?

‘3 इडियट्स’नंतर आता ‘4 इडियट्स’; आमिर खानच्या चित्रपटात चौथ्या