प्रत्येक महिन्यातील चार किंवा पाच दिवस महिलांना मासिक पाळीच्या समस्यांना सामोरे जावे लागते.(relief) मासिक पाळीचे चक्र २८ दिवसांचे असते. यामध्ये शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलांमुळे योनीमार्गातून दर महिन्याला रक्तस्त्राव होतो. मासिक पाळी येण्याच्या आधी आणि पाळी आल्यानंतर अनेक शारीरिक समस्या उद्भवतात. पोटात दुखणे, कंबर दुखणे, ओटीपोटात दुखणे, अतिरक्तस्त्राव किंवा पचनाच्या समस्या उद्भवू लागतात. मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी महिला मेडिकलमध्ये उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पेनकिलर गोळ्यांचे सेवन करतात. पण वारंवार पेनकिलर खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. पेनकिलरच्या गोळ्या खाल्यामुळे किडनी निकामी होते. त्यामुळे वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावेत.

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे किंवा पेयांचे सेवन केले जाते. मात्र तरीसुद्धा फारसा आराम पडत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीतील वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी लवंगचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. लवंगचा काढा, लवंग तेल आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली लवंग आरोग्यासाठी प्रभावी ठरते.
प्रत्येक घरात खड्डे मसाले उपलब्ध असतात. त्यात अतिशय आवडीने वापरला जाणारा मसाला म्हणजे लवंग. लवंग पदार्थाची चव वाढवण्यास मदत करते. याशिवाय घरात काढा बनवताना तुम्ही लवंग वापरू शकता. एक ग्लास पाणी टोपात गरम करून घ्या. त्यानंतर त्यात ५ किंवा ६ लवंग टाकून व्यवस्थित उकळा. (relief) तयार केलेले पाणी गाळून त्यात मध किंवा गूळ टाकून सेवन केल्यास मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळेल. पोट दुखीचा त्रास कमी करण्यासाठी लवंग काढा अतिशय गुणकारी ठरतो.

लवंग खाणे:
पोटात वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी दातांखाली लवंग ठेवून चघळावी. यामुळे वेदनांपासून आराम मिळतो आणि पाळीमध्ये वाढलेला रक्तस्त्राव कमी होतो. याशिवाय लवंग खाल्यामुळे तोंडात वाढलेली दुर्गंधी सुद्धा कमी होते.
लवंग तेल:
ओटीपोटात वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी लवंग तेलाचा वापर करावा. लवंग तेलाने पोटाला मालिश करावी. यामुळे पोटाच्या खालच्या भागातील स्नायू हलके होण्यास मदत होईल. तसेच पोटाच्या वेदनांपासून आराम मिळेल. लवंगमध्ये नॅचरल अॅंटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म आढळून येतात.(relief) यामुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये वाढलेला गॅस आणि अपचनाची समस्या दूर होते.

मासिक पाळी म्हणजे स्त्रीच्या शरीरात दर महिन्याला होणारे बदल, ज्यामध्ये योनीमार्गातून रक्तस्त्राव होतो. साधारणपणे, ही पाळी १२-१३ वर्षांच्या सुमारास सुरू होते आणि प्रत्येक महिन्यातून एकदा येते.स्वच्छता: मासिक पाळीच्या काळात स्वच्छता राखणे महत्वाचे आहे. पॅड किंवा टॅम्पॉनचा वापर: पॅड किंवा टॅम्पॉनचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.
आहार: संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. तणाव कमी करणे: तणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि योगा करणे फायदेशीर आहे.मासिक पाळीचे चक्र सरासरी २८ दिवसांचे असते, पण ते प्रत्येकी वेगवेगळे असू शकते. काही स्त्रियांच्या बाबतीत ते २१ ते ३८ दिवसांपर्यंत असू शकते, तर काहींमध्ये ४५ दिवसांपर्यंतही असू शकते.
हेही वाचा :
भारतातील असे 3 शिवमंदिर जिथे मिळते खाण्यापिण्याची आणि राहण्याची फ्री सुविधा; यंदाच्या श्रावणात एकदा नक्की भेट द्या
महादेवी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूरआत्मक्लेश मूक मोर्चा
“संशया”वरून दोष सिद्धी नाही “मालेगाव स्फोट”आरोपी निर्दोष