पावसाच्या उशिरामुळे पुणे शहरासमोर गंभीर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील साठा झपाट्याने कमी झाल्याने पुणे महानगरपालिका प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले असून (water) येत्या काही दिवसांत अनेक बाबींवर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.

धरणांतील घटता साठा चिंतेचा विषय यंदा मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असताना पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण समूह मधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. सध्या धरणांमध्ये सुमारे 5 टीएमसी पाणी शिल्लक असून शहराच्या गरजेसाठी दरमहा जवळपास 1.6 टीएमसी पाण्याचा वापर केला जातो. (water) त्यामुळे उपलब्ध साठा दीर्घकाळ पुरवणे प्रशासनासाठी आव्हानात्मक बनले आहे.या पार्श्वभूमीवर पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी सोमवारपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नागरिकांनी पाण्याची नासाडी टाळावी, आवश्यक तेवढाच वापर करावा आणि घरात पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पाणी बचतीसाठी विविध उपाययोजना राबविण्याची तयारीही सुरू आहे.
कार वॉश, स्विमिंग पूलवरही होऊ शकतात निर्बंध पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे महानगरपालिका व्यावसायिक वापरावर नियंत्रण आणण्याचा विचार करत आहे. कार वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूल तसेच बांधकाम क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या पाण्यावर कठोर निर्बंध लागू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. नागरिक आणि व्यावसायिक आस्थापनांना आवश्यक तयारी करता यावी यासाठी प्रशासनाने सुमारे एका आठवड्याचा कालावधी दिला आहे.सध्या काही भागांमध्ये तांत्रिक कारणांमुळे कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. सर्व आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील आठवड्यापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा व्यवस्था पूर्ण क्षमतेने लागू केली जाणार आहे. या संदर्भात जलसंपदा विभाग यांच्याशीही चर्चा करण्यात येणार आहे.(water) दरम्यान, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नागरिकांना पाण्याचा अपव्यय पूर्णपणे थांबवण्याचे आणि उपलब्ध पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा :
पैशाच्या वादातून मुकादमाचे अपहरण