स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निम्न शहरी मतदारांनी महायुतीच्या (accepted)पदरात विजयाचे दान टाकताना महाविकास आघाडीला चांगलेच फटकारले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात म .वि .आ. ला नाम मात्र यश मिळाले आहे.जवळपास हद्दपार करून टाकले आहे. तुतारीचा आवाज फारसा ऐकू आला नाही. आणि मशालीचा उजेड फारसा पडला नाही. नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणूक निकालाने नजीकच्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर चांगलाच परिणाम होणार आहे. कारण आत्ता झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ग्रामीण भागाला अगदी जवळच्या आहेत.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आज दुभंगलेल्या अवस्थेत असली तरी त्याच्या आधीचा काळ हा त्यांच्यासाठी सुवर्णकाळ होता. अखंडित शिवसेनेचे दोन खासदार होते, सहा आमदार होते. अखंड राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती बऱ्यापैकी होती. आता मात्र या दोन्ही पक्षांची कोल्हापूर जिल्ह्यात आणि राज्यातही दयनीय अवस्था झाली आहे.

एकूणच महाविकास आघाडीला सर्वसामान्य मतदारांनी नाकारले आहे.(accepted)स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक प्रश्न मांडले जातात. राज्य पातळीवरचा लेखाजोखा गाव पातळीवर मांडला जात नाही. पण राज्यात सत्तेवर असलेल्या मंडळींकडून स्थानिक पातळीवरचे विकासाशी आणि मूलभूत सुविधांशी निगडित असलेले प्रश्न सोडवले जाऊ शकतात असा विचार करून मतदारांनी महायुतीला हा मोठा कौल दिला आहे. राज्यकर्त्यांनी सुद्धा तसा विश्वास मतदारांमध्ये निर्माण करण्यात यश मिळवले असेही म्हणता येईल.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी मोठ्या जिद्दीने आणि निर्धाराने उतरली होती असे चित्र दिसले नाही. महाविकास आघाडी घटक पक्षाचे नेते किंवा उपनेते ही प्रचारात दिसले नाहीत. त्यांनी स्थानिक नेत्यांवर विश्वास ठेवला आणि निवडणूक जिंकण्याची जबाबदारी ही त्यांच्यावरच सोपवली.
आता कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना (accepted)आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस इथे उरली सुरली आहे. या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांचा प्रभाव सामान्य मतदारांवर पडलेला नाही. किंवा त्यांच्या कडे पुरेशा प्रमाणात संघटन कौशल्य नव्हते असेही म्हणता येईल.कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तीन, एकनाथ शिंदे शिवसेनेचे चार, जनसुराज्य शक्ती पक्षाचे दोन आणि अजित दादा पवार राष्ट्रवादी गटाचे दोन उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. दोन ठिकाणी काँग्रेस सह स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली आहे.नगराध्यक्ष पदाच्या 13 जागांसाठी 256 उमेदवार रिंगणात होते तर नगरसेवकांच्या 254 जागांसाठी 800 उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरले होते.या निवडणुकीत जन सुराज्य शक्ती पक्षाचे आमदार अशोकराव माने यांनी आपली सून सारिका अरविंद माने तसेच मुलगा अरविंद अशोक माने आणि पुतण्या या तिघांना उमेदवारी दिली होती. मात्र सामान्य मतदारांनी त्यांची ही घराणेशाही उधळून लावली.
तर कागल मध्ये एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू समरजीत सिंह घाटगे(accepted) आणि मंत्री हसन मुश्रीफ हे दोघे एकत्र आले होते आणि या निवडणुकीत कागल मध्ये यश मिळाल्यानंतर या दोघांनीही एकमेकांना आलिंगन देऊन आनंद व्यक्त केला. हे दृश्य पाहून स्थानिक लोक सुद्धा चकित झाले.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने राज्यात दणकेबाज यश मिळवले आहे. भारतीय जनता पक्षाला 117 नगराध्यक्ष मिळाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अर्धशतक पार केले आहे तर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने37 जागेपर्यंत मजल मारली आहे.नगराध्यक्ष पदाच्या एकूण 288 जागांपैकी 207 जागा महायुतीने पटकावल्या आहेत. महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीचे अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. केवळ 44 जागा जिंकल्या असल्या तरी त्यामध्ये काँग्रेसची संख्या जास्त आहे. स्थानिक आघाड्यांनीही 20 पेक्षा अधिक ठिकाणी विजय संपादन केला आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका राज्यातील (accepted)महापालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर होतील. महापालिकांच्या निवडणुकांवर मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालांचा प्रभाव पडणार आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे या दोघांनी मुंबई महापालिकेसह आसपासच्या महापालिका निवडणुकींवर लक्ष केंद्रित केले आहे. सर्वांचे लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालाकडे असणार आहे.नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायती या निवडणुकीत
जे राजकीय चित्र पुढे आले आहे तेच चित्र महापालिकांच्या जानेवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसेल असे ठामपणे म्हणता येणार नसलेतरी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार तसेच राष्ट्रीय काँग्रेस च्या नेत्यांसमोर मोठे आव्हान उभे आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करूनउद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिका आपल्या हातातठेवता येईल का याचे उत्तर जानेवारी महिन्याच्या दिनांक 16 रोजी महाराष्ट्राच्या जनतेला मिळणार आहे.पैसे वाटले जातात, मतदार यादी मध्ये घडवून आणलेला घोळ आहे, मत चोरी केली जाणार आहे अशा तक्रारी करून चालणार नाही तर एक मजबूत विकासात्मक कार्यक्रम घेऊन या मंडळींनी या निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालांचा प्रभाव महानगरपालिकांच्या निवडणुकांवर असणार आहे हे मात्र नाकारता येणार नाही.
हेही वाचा :
नवीन वर्षात गृहिणींना मोठं गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार?
भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना ‘Z+’ सुरक्षा, कारण काय?
‘3 इडियट्स’नंतर आता ‘4 इडियट्स’; आमिर खानच्या चित्रपटात चौथ्या