न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडलेल्या महाराष्ट्रातील 23 नगरपालिकांसह (extremely)76 नगरपंचायती 154 जागांसाठी मतदान घेण्यात आले. महाराष्ट्रात पहिल्यादांच मतदानावेळी अत्यंत भयानक प्रकार घडला आहे. मतदानासाठी आलेल्या 1 हजारपेक्षा जास्त मतदारांना लग्नाच्या हॉलमध्ये कोंडून ठेवण्यात आले. मराठवाड्यातील नांदेडसह मुंबईजवळ असलेल्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये देखील मतदारांना कोंडून ठेवण्यात आले. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी राष्ट्रवादीने भाजप विरोधात तक्रार दाखल केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद मध्ये एका मंगल कार्यालयात मतदारांना (extremely)डांबून ठेवल्याचा गंभीर प्रकार उघड झाला. जवळपास एक हजार लोकांना या ठिकाणी सकाळपासून अकरा वाजेपर्यंत डांबून ठेवण्यात आले होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पैश्यांचे अमिष दाखवून इथे आणून डांबून ठेवल्याचा आरोप मतदारानाही केला. या प्रकरणी राष्ट्रवादीकडून अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.अंबरनाथच्या ग्रीन सिटी प्रभाग क्रमांक 29 मध्ये एक अजब प्रकार घडला. या ठिकाणी ईव्हीएम मशीन घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेच बोगस आयकार्ड सापडले आहेत. या ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे दुसरे मशीन मागवण्यात आले. मात्र, जे कर्मचारी मशीन घेऊन आले त्यांच्या आयकार्डवर फोटो आणि नाव तसंच सही, शिक्का देखील नव्हता. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. अंबरनाथ मध्ये बोगस मतदार सापडले. 188 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

शिवसेना पदाधिकारी आणि ठेकेदार विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे(extremely) शिवसेना शिंदें गटाने हे सर्व बोगस मतदार आणल्याचा भाजप आणि काँग्रेसचा आरोप आहे. एका पुढार्‍याच्या मंगल कार्यालयात एकाच ठिकाणी शेकडो महिला आढळल्या आहेत. काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघड केला. अंबरनाथ नगरपालिकेच्या 59 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. काल रात्री दहा वाजता प्रचार याचा कालावधी संपला. मात्र, त्यानंतर रात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास अंबरनाथ चिंचपाडा कोसगाव परिसरातील एका मंगल कार्यालयात बाहेरून बोगस मतदार आणण्याचा संशय काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना आला, त्यानंतर काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी रात्रीपासूनच या मंगल कार्यालया बाहेर जागता पहायला ठेवला.

बारामतीत बोगस मतदानाचा प्रकार समोर आला आहे.(extremely) एका मतदाराचं मतदान आधी कोणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.बारामतीतील अहिल्यानगर देवी कल्ब या मतदार केंद्रात हा प्रकार घडला आहे. अमित दिलीप कुलथे मतदान केंद्रात दाखल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. निवडणूक केंद्रातील कर्मचा-यांनी टेंडर वॉट फॉर्म भरुन घेतल्यानंतर कुलथे यांनी मतदान केले. मात्र, याआधी अमित कुलथे यांच्या नावाने कुणी मतदान केले याबद्दल संशय आहे. याबाबत विचारलं असता निवडणूक अधिका-यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

हेही वाचा :

नवीन वर्षात गृहिणींना मोठं गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार?

भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना ‘Z+’ सुरक्षा, कारण काय?

‘3 इडियट्स’नंतर आता ‘4 इडियट्स’; आमिर खानच्या चित्रपटात चौथ्या