नाशिक महानगरपालिकेतील राजकारणात मोठा बदल घडताना दिसत आहे.(Excitement) शिंदेसेना आणि भाजप यांच्यात नाशिकमध्ये युती होण्याची चर्चा सुरू असतानाच आता शिंदेसेना आणि मनसे यांच्या आघाडीचं नवं समीकरण समोर आलं आहे. या नव्या घडामोडीमुळे शहरातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या आघाडीला ‘शिवसेना-मनसे आघाडी’ असं नामकरण करण्यात आलं असून, मनसेला सोबत घेतल्यामुळे शिंदेसेना(Excitement) आणि मनसे मिळून स्थायी समितीवर एक अतिरिक्त सदस्य वाढणार आहे.

त्यामुळे आगामी काळात महापालिकेतील सत्तासमीकरणांवर याचा थेट परिणाम होणार आहे.(Excitement)नाशिक महानगरपालिकेत मनसेची मयुरी पवार या एकमेव नगरसेविका आहेत. विशेष म्हणजे त्यांनी यापूर्वी ठाकरे गटाच्या शिवसेनेसह निवडणूक लढवली होती, मात्र सत्ता स्थापनेपूर्वीच त्या शिंदेसेनेसोबत गेल्याने राजकीय चर्चांना अधिकच वेग आला आहे. आगामी काळात भाजप, ठाकरे गट आणि इतर पक्षांची भूमिका काय राहणार, याकडे लक्ष लागलं आहे.

हेही वाचा :

सिमेवरच्या तारांच्या कुंपणाला जवान रिकाम्या काचेच्या बाटल्या का अडकवतात? खरं कारण कळलं तर तुम्हीही हे उपाय लावाल

सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ ओटीटीवर येणार! कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या सविस्तर

मुंबई हादरली; हायड्रोजन फुग्यांचा स्फोट, 3 जण गंभीर भाजले – धक्कादायक VIDEO समोर