जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान राज्यात मोठी घडामोड घडली आहे.(entire) राज्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढणार आहे. लवकरच एक अख्खा पक्ष शिवसेना शिंदे गटामध्ये विलीन होणार आहे. माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी शंकर अण्णा धोंडगे यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. शंकर अण्णा धोंडगे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी नेते आणि (entire)माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची नांदेड जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. आगामी नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी शंकर अण्णा धोंडगे यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. धोंडगे यांचा महाराष्ट्र राज्य समिती हा पक्षसुद्धा शिवसेनेत विलीन होणार असल्याची माहिती आहे.

माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य समिती (entire)पक्षाचे राज्यातील २२ जिल्हाध्यक्ष शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. बीआरएसने विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून माघार घेतल्यानंतर शंकर अण्णा धोंडगे यांनी बीआसएसच्या धरतीवर एमआरएस हा पक्ष काढला होता. शेतकरी चळवळीपासून शंकर अण्णा धोंडगे यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती.

शंकर अण्ण धोंडगे हे लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. राष्ट्रवादी पक्षाकडून ते आमदार म्हणून लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. शेतकरी नेते म्हणून त्यांची राज्यभरात ओळख आहे. शंकर अण्णा धोंडगे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशानंतर लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

सिमेवरच्या तारांच्या कुंपणाला जवान रिकाम्या काचेच्या बाटल्या का अडकवतात? खरं कारण कळलं तर तुम्हीही हे उपाय लावाल

सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ ओटीटीवर येणार! कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या सविस्तर

मुंबई हादरली; हायड्रोजन फुग्यांचा स्फोट, 3 जण गंभीर भाजले – धक्कादायक VIDEO समोर