जळगावातील नशिराबाद नगरपंचायत निवडणुकीत 77 वर्षांच्या (achievement)आजीबाईं जनाबाई रंधे या नगरसेवकपदी विजयी झाल्या आहेत. वयाच्या 77 व्या वर्षी पायात साधी चप्पलही न घालता, कडक उन्हातान्हात प्रचार करणाऱ्या जनाबाई रंधे यांनी नगरसेवकपदी विजय मिळवला आहे.ना पायात चप्पल ना हातात काठी, तरुणांना लाजवेल असा या आजीबाईंचा वयाच्या 77 व्या वर्षी देखील उत्साह आहे. या वयात जिथे अनेकजण निवृत्तीचा मार्ग स्वीकारतात, तिथे जनाबाईंनी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी स्वीकारून तरुणांसमोरही एक आदर्श ठेवला आहे.

नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर जेव्हा(achievement)त्या नगरपरिषद प्रांगणात आल्या, तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले. कार्यकर्त्यांची आणि जवळच्या व्यक्तींची गळाभेट घेताना त्यांचे डोळे पाणावले. हे पाहून उपस्थितही भावूक झाले होते.जनाबाई रंधे यांचा हा विजय म्हणजे जिद्द आणि विश्वासाचा विजय असल्याचं मानलं जात आहे. आयुष्याच्या या टप्प्यावरही जनतेसाठी काहीतरी कार्य करण्याची जनाबाई यांची जिद्द अनेकांसाठी प्रेरणा ठरतेय.

जनाबाई रंधे यांनी भाजप पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. (achievement)नशिराबादमधल्या प्रभाग क्रमांक 7 अ मधून त्यांनी निवडणूक लढवली आणि तिथे त्या विजयी झाल्या आहेत. मतमोजणी केंद्रात विजयी झाल्याची घोषणा झाल्यावर आनंदात त्यांना अश्रू अनावर झाले. जनाबाईंनी आयुष्यात पहिल्यांदा निवडणूक लढवण्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा :
नवीन वर्षात गृहिणींना मोठं गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार?
भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना ‘Z+’ सुरक्षा, कारण काय?
‘3 इडियट्स’नंतर आता ‘4 इडियट्स’; आमिर खानच्या चित्रपटात चौथ्या