स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरपरिषद आणि नगरपालिका(pattern) निवडणुकींमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दमदार कामगिरी केली असून पुण्यामध्ये मैत्रीपूर्ण लढतीच्या माध्यमातून थेट आव्हान देणाऱ्या भारतीय जनता पार्टीला अजित पवारांनी आपल्या होम ग्राऊण्डवरुन दणका दिला आहे. या निवडणुकांच्या निकालांमुळे अजित पवारांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला असून आता आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठीही भाजपाने स्वबळाचा नारा दिल्याने अजित पवारांनी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार आता सत्तेतील वाटेकरी असलेला सर्वात मोठा पक्ष म्हणजे भाजपाविरोधात महाविकास आघाडीतील पक्षांसोबत युती करण्याच्या तयारीत असून ‘नवा पुणे पॅटर्न’ जन्माला घालणार असल्याचे संकेत दिसत आहेत.

नगरपरिषदांचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी (pattern)अजित पवारांनी काँग्रेस नेते आणि पुणे प्रभारी सतेज पाटील यांना फोन केला. पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादीसोबत येण्यासंदर्भात सतेज पाटील यांच्याशी अजित पवारांनी प्राथमिक चर्चा केली. अजित पवाराकडून शरद पवार राष्ट्रवादी, आणि काँग्रेस एकत्र येण्यासंदर्भात संपर्क करण्यात आला. त्याच अनुषंगाने दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, अजित पवार यांच्याकडून फोन आल्याच्या वृत्ताला आमदार सतेज पाटील यांनी दुजोरा दिला असल्याने अजित पवारांनी भाजपाला त्यांच्याच स्टाइलमध्ये उत्तर देण्यासाठी सूत्र हालवण्यास सुरुवात केल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (pattern)यांना शरद पवारांनी मुंबईला बोलावून घेतल्याची माहिती समोर येत आहे. पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास जगताप यांचा विरोध आहे. मुंबईतील भेटीदरम्यान शरद पवार जगताप यांना समजावून सांगणार का? अशी चर्चा आता दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी आता थेट पवारांची मध्यस्थी होणार असल्याने ही आघाडी जुळून येईलच असं कार्यकर्त्यांना वाटत आहे. जगताप आणि पवारांच्या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेही उपस्थित असतील असं सांगण्यात आलं आहे.

या दोन्ही घडामोडींवरुन पुण्यात भाजपविरोधात अजित पवार महाविकास (pattern)आघाडीलाच सोबत घेण्याची शक्यता अधिक वाढली आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये पवार काका-पुतण्या सर्व विरोधकांची एकत्रित मोट बांधून भाजपविरोधात ‘नवा पुणे पॅटर्न’ जन्माला घालणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा पुणे पॅटर्न खरोखरच जुळून आला तर भविष्यात ज्या ज्या ठिकाणी भाजपाकडून स्वबळाची भाषा केली जाईल तिथे हा पॅटर्न वापरला जाण्याची शक्यता फेटाळता येत नाही. या ‘पुणे पॅटर्न’च्या माध्यमातून राज्यात वेगळं राजकारण पाहायला मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र या साऱ्या चर्चा प्राथमिक स्तरावर असल्या तरी पुढील काही दिवसांमध्ये अंतिम निर्णय घेणं पक्षांना बंधनकारक असणार आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे 23 तारखेपासून अर्जभरण्याची मुदत सुरु होत आहे.
हेही वाचा :
नवीन वर्षात गृहिणींना मोठं गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार?
भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना ‘Z+’ सुरक्षा, कारण काय?
‘3 इडियट्स’नंतर आता ‘4 इडियट्स’; आमिर खानच्या चित्रपटात चौथ्या