स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये स्रवाधिक जागा जिंकत भाजप सर्वात मोठा ठरला आहे.(defection) अशातच भाजपला धक्का देणारी घडामोड घडली आहे. मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या नेत्याने 400 कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मीरा भाईंदर महापालिका निवडणुकांच्या तोंडवर भाजपसाछी हा मोठा धक्का मानला जात आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.भाजपाचे प्रदेश कार्यालय सदस्य अजय अर्जुन शिंग राजपूत यांनी तब्बल 400 कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ढोल–ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा मिळाला असून भाजपासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. काँग्रेसचे माजी आमदार मुझफर हुसेन यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश झाला. प्रवेशावेळी माजी आमदार मुझफर हुसेन यांनी पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा मिळाला असून भाजपासाठी (defection)हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, याचा थेट परिणाम स्थानिक राजकीय समीकरणांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रवेशावेळी माजी आमदार मुझफर हुसेन यांनी पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला, तर अजय शिंग राजपूत यांनी काँग्रेसची विचारधारा आणि नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आगामी निवडणुकांमध्ये जोमाने काम करण्याचा संकल्प केला आहे.

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला धक्का दिलाय. (defection)सोलापुरातील भाजप नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांची सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आलीये.. आमदार शहाजीबापू पाटील यांना निवडून आणण्यात अतुल पवार यांचा महत्त्वाचा वाटा होता. प्रेमात, युद्धात आणि निवडणुकीत सगळं माफ असतं अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नाराजीवर महाजनांनी हे वक्त्वय केलंय. दोन दिवसांपूर्वी पिंपरीत ऑपरेश लोटस राबवण्यात आलं होतं. पिंपरीतील तब्बल 11 माजी नगरसेवकांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे अजित पवार नाराज होते. त्यावर महाजनांनी प्रतिक्रिया दिलीय.

हेही वाचा :

नवीन वर्षात गृहिणींना मोठं गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार?

भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना ‘Z+’ सुरक्षा, कारण काय?

‘3 इडियट्स’नंतर आता ‘4 इडियट्स’; आमिर खानच्या चित्रपटात चौथ्या