कोटक महिंद्रा बँकेने आपल्या ग्राहकांसाठी(Customers) मोठा बदल जाहीर केला आहे. बँकेने सांगितले आहे की, आता एसएमएस अलर्ट सेवेसाठी शुल्क आकारले जाणार आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, हा निर्णय कामकाजाशी संबंधित वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी घेतला गेला आहे. मात्र, खात्याशी संबंधित माहिती वेळेवर ग्राहकांपर्यंत पोहोचावी यासाठी बँक कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. कोटक महिंद्रा बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ग्राहकांना दर महिन्याला ३० एसएमएस अलर्ट पूर्णपणे मोफत मिळणार आहेत. परंतु, जर एखाद्या ग्राहकाला महिन्याभरात ३० पेक्षा जास्त एसएमएस अलर्ट मिळाले, तर प्रत्येक अतिरिक्त एसएमएससाठी ०.१५ पैसे शुल्क आकारले जाईल.

याचा अर्थ असा की, जर तुमच्या खात्यावर वारंवार व्यवहार होत असतील आणि महिन्यात ३० पेक्षा जास्त नोटिफिकेशन्स येत असतील, तर प्रत्येक अतिरिक्त एसएमएससाठी तुम्हाला हे शुल्क भरावे लागेल. हे नवे शुल्क प्रामुख्याने युपीआय , एनईएफटी , आरटीजीएस , आयएमपीएस व्यवहारांसाठी येणाऱ्या एसएमएस अलर्टवर लागू होईल.तसेच, एटीएममधून रोख रक्कम काढणे, चेक जमा करणे, रोख व्यवहार करणे, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरणे या सर्व व्यवहारांवर येणाऱ्या एसएमएस नोटिफिकेशन्सवरही हे शुल्क लागू होणार आहे.

ग्राहकांसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे, ज्या ग्राहकांच्या(Customers) बचत किंवा पगार खात्यात किमान १०,००० रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम शिल्लक असेल, त्यांना या नियमाचा फटका बसणार नाही.अशा ग्राहकांना महिन्यात ३० पेक्षा जास्त एसएमएस आले तरी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजेच, ही अट पूर्ण करणाऱ्या खातेदारांना एसएमएस अलर्ट सेवा पूर्वीप्रमाणे मोफत मिळत राहणार आहे.

ग्राहकांसाठी आणखी एक सकारात्मक बातमी म्हणजे, कोटक महिंद्रा बँकेने डेबिट कार्डचे वार्षिक शुल्क आणि जारी शुल्क कमी केले आहे. हे नवे दर १ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत.– ‘Privy League Black Metal Debit’ कार्डचे शुल्क — पूर्वी ५,००० रुपये होते, आता फक्त १,५०० रुपये करण्यात आले आहे.– ‘Privy League LED Debit’ कार्डचे शुल्क — २,५०० रुपयांवरून कमी करून १,५०० रुपये करण्यात आले आहे.

हेही वाचा :

‘या’ क्रिकेटरला सख्ख्या मुलाप्रमाणे मानतात धर्मेंद्र, सनी आणि बॉबी सारखंच करतात प्रेम
Maruti E-Vitara ‘या’ दिवशी भारतात लाँच होण्यास सज्ज
गौतमी पाटील ‘नऊवारी’ गाण्यात प्रथमच दिसली रणरागिणीच्या भूमिकेत, गाणे तुफान व्हायरल