बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र देओल(actor) यांची तब्येत सध्या ठीक नाही. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जात असून त्यांचे फॅन्स धर्मेंद्र यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. 10 नोव्हेंबर रोजी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं आणि मागच्या आठवड्यात त्यांना नियमित तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं होतं. सध्या त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती तसेच बॉलिवूडमधील अनेक स्टार कलाकार त्यांच्या तब्येतीची विचारपूरस करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले आहे. अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान यांनी सुद्धा धर्मेंद्र देओल यांच्या तब्येतीची विचारपूरस करण्यासाठी हॉस्पिटल गाठलं होतं.

अभिनेते धर्मेंद्र याना सिनेमांप्रमाणे क्रिकेट सामने पाहणं सुद्धा आवडतं. ते टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरला आपल्या मुलाप्रमाणे मानतात. अनेकदा मुलाखतींमधून सुद्धा त्यांनी याबाबत सांगितलं होतं. तसेच काही वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकर आणि धर्मेंद्र यांची भेट अचानक एका विमानात झाली होती, त्यावेळी एक फोटो धर्मेंद्र यांनी शेअर केला. यावेळी धर्मेंद्रने सचिनला त्यांचा लाडका मुलगा असं म्हटलं होतं. सचिन तेंडुलकरला भारत सरकारकडून ‘भारतरत्न’ या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलं आहे. सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा बनवण्याचा रेकॉर्ड सुद्धा आहे.
अभिनेते धर्मेंद्र 2021 मध्ये सचिन तेंडुलकरला एका विमानात भेटले. सोशल मीडियावर त्यांनी फोटो शेअर केला आणि लिहीलं की, ‘देशाचा अभिमान, मला अचानक सचिन विमानात भेटला… सचिन नेहमीच माझ्या लाडक्या मुलासारखा वाटतो… सचिन चिरंजीव होवो… तुला खूप खूप प्रेम’.
अभिनेते धर्मेंद्र देओल यांचा जन्म हा 8 डिसेंबर 1935 रोजी झाला होता. धर्मेंद्र (actor)आता 89 वर्षांचे आहेत. धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न हे प्रकाश कौर यांच्यासोबत झालं होतं. पहिल्या पत्नीपासून धर्मेंद्र यांना सनी देओल, बॉबी देओल, अजीता आणि विजया अशी चार मुलं आहेत. धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नी सोबत घटस्फोट न घेता हेमा मालिनी सोबत दुसरं लग्न केलं होतं, त्यानंतर असं म्हटलं जाऊ लागलं की हेमामालिनीशी लग्न करण्यासाठी मुस्लिम धर्म स्वीकारला होता. पण त्यांनी या दाव्याचं खंडन केलं. धर्मेंद्र यांना हेमा मालिनीकडून दोन मुली आहेत त्यांची नाव ईशा आणि आहाना देओल अशी असून दोघी मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत.

हेही वाचा :
Maruti E-Vitara ‘या’ दिवशी भारतात लाँच होण्यास सज्ज
गौतमी पाटील ‘नऊवारी’ गाण्यात प्रथमच दिसली रणरागिणीच्या भूमिकेत, गाणे तुफान व्हायरल
Vivo चा धमाकेदार फोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स